आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभ बच्‍चन यांनी राष्‍ट्रगीतासाठी 4 कोटी घेतल्‍याचे वृत्‍त गांगुलीने फेटाळले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारत पाकिस्‍तान यांच्‍यातील टी- 20 सामन्याआधी अमिताभ बच्‍चन यांनी कोलकात्यात राष्‍ट्रगीताचे गायन केले. राष्ट्रगीतासाठी कोणतेही पैसे घेतले नसल्याचे स्पष्टीकरण अमिताभ बच्चन यांनी दिले आहे. काय आहे प्रकरण..

- काल कोलकातामध्‍ये ईडन गार्डनवर भारत-पाक यांच्‍यात टी-20 सामना झाला.
- सामन्याआधी अमिताभ यांनी राष्ट्रगीताचे गायन केले.
- त्यासाठी अमिताभ यांनी 4 कोटी रुपये घेतल्याचा दावा सोशल मीडियावर सुरु होता.
- मात्र, हे वृत्त पूर्णपणे निराधार असल्‍याचा दावा अमिताभ यांनी केला.
- राष्ट्रगीत गाण्यासाठी पैसे घेणारा माणूस हा गरीब मनाचा असतो, असे ते म्‍हणाले.
काय गांगुलीनेही फेटाळले..
- अमिताभ यांनी पैसे घेतल्‍याचे वृत्‍त माजी कर्णधार सौरव गांगुलीने फेटाळले.
- अमिताभ स्वखर्चाने कोलकात्यात आले, राष्ट्रगीतासाठीचे मानधन नाकारले.
- त्‍यांनी स्वतः चार्टर्ड प्लेनचे भाडे भरले, असे गांगुलीने सांगितले.
- अमिताभ यांच्‍यासाठी हॉटेलची व्यवस्था करण्‍यात आली होती. ती त्‍यांनी नाकारली.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, अमिताभ यांचे ईडन गार्डनवरील फोटो..