आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amitabh Bachchhan And Priyanka's Name Finalised For Brand

प्रियंका-अमिताभ असतील 'अतुल्य भारत'चे अॅम्बेसेडर, मोफत करणार कँपेन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमिताभ बच्चन आणि प्रियंका चोप्रा (फाइल फोटो). - Divya Marathi
अमिताभ बच्चन आणि प्रियंका चोप्रा (फाइल फोटो).
नवी दिल्ली - इन्क्रेडिबल इंडिया कॅम्पेनचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि अमिताभ बच्चन यांची नावे निश्चित झाली आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार पर्यटन मंत्रालयाने गुरुवारी त्यांना पत्र पाठवले आहे. 26 जानेवारीनंतर दोघांच्या नावाची घोषणा केली जाऊ शकते.

चार सेलिब्रिटींची नावे होती स्पर्धेत
- सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमिताभ, प्रियंकाशिवाय दीपिका पादुकोण आणि अक्षय कुमार यांची नावेही स्पर्धेत होती.
- गुरुवारी मंत्रालयाकडून प्रियंका आणि अमिताभला पत्र पाठवण्यात आले आहे.
- एका वेबसाइटनुसार दोघेही तीन वर्षे इन्क्रेडिबल इंडियासाठी अॅड कॅम्पेन करतील.
- कॅम्पेनसाठी दोघांनीही कोणत्याही प्रकारचे मानधन घेतलेले नाही.

अमिताभच का...
- सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या अॅड कॅम्पेनसाठी अमिताभ यांनाच पहिली पसंती होती.
- अमिताभ गुजरात सरकारचे ब्रँड अॅम्बेसेडर राहिलेले आहेत. त्यावेळी कँपेन प्रसिद्ध झाले होते.
- अमिताभ वादांपासून दूर असल्याने त्यांची निवड झाल्याचे सांगण्यात येते.

#Intolerance वरील प्रतिकियेनंतर आमीरची गच्छंती
- नोव्हेंबरमध्ये आमीर खान म्हणाला होता की, देशातील वातावरण पाहून एकदा त्याची पत्नी किरणने त्याला देश सोडण्याबाबत विचारले होते. आमीरच्या मते किरणला मुलांच्या भवितव्याची चिंता होती.
- या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर आमीर खानला विरोधाचा सामना करावा लागला होता.
- नंतर आमीर खानला पर्यटन मंत्रालयाच्या जाहिरातीतून काढण्यात आले होते.

‘इन्क्रेडिबल इंडिया’ नव्हे ‘अतिथि देवो भव:’ चा ब्रँड अॅम्बेसेडर
- आमिर खानला ज्या जाहिरातीतून हटवल्याचा वाद आहे ती ‘इन्क्रेडिबल इंडिया’ नव्हे तर ‘अतिथि देवो भव:’ची होती.
- ‘इन्क्रेडिबल इंडिया’ कॅम्पेन को ‘ओ अँड एम इंडिया’ ने तयार केले होते.
- आमीर ‘अतिथि देवो भव:’ कॅम्पेनचा ब्रँड अॅम्बेसेडर होता.