आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amitabh, Rajni, Salman Would Be Present For Modis Swearing Ceremony

नरेंद्र मोदींच्या शपथविधीच्या रेड कार्पेटवर अवतरणार बॉलिवूड स्टार्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली : भारतीय राजकारणाच्या इतिहासात सर्वात मोठा विजय मिळवून पंतप्रधान पदाकडे मार्गक्रमण केलेल्या नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीचा सोहळा भलताच खास होणार असे संकेत मिळत आहेत. मोदी यांच्या या शपथविधीसाठी सार्क देशांना निमंत्रण पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी बहुतांश नेत्यांनी निमंत्रण स्वीकारले असून उपस्थित राहणार असल्याचे कळवले आहे. पण आता रजनीकांत, बिग बी आणि सलमान खान सारख्या बड्या ता-यांच्या उपस्थितीत या सोहळ्याचा झगमगाट अधिक वाढणार अशी शक्यता आहे. कारण मोदींच्या शपथविधीसाठी या ता-यांनाही आमंत्रित करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.
अमिताभ यांचे मोदींशी असलेले नाते सर्वांनाच ठाऊक आहे. त्यांनी अनेकदा मोदींवर स्तुतीसुमने उधळली आहेत. त्याचप्रमाणे गुजरातचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असल्याने या दोघांमधील नाते अधिक दृढ झालेले आहे. त्यामुळे मोदींनी अमिताभ बच्चन यांना खास निमंत्रण पाठवल्याची चर्चा आहे. त्याच प्रमाणे दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत यांनेही मोदींनी जेव्हा प्रचारादरम्यान त्याची भेट घेतली त्यावेळी त्यानेही मोदींनी पाठिंबा जाहीर केला होता. दक्षिणेत रजीनकांतपेक्षा दुसरे मोठे नाव असूच शकत नाही, याची जाणीव असल्यानेच मोदींनी त्यांना बोलावणे पाठवले असणार.
सलमान खानने निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी मोदींबरोबर चांगलीच पतंगबाजी केली होती. त्याचवेळी त्याने मोदींवर स्तुतीसुमनेही उधळली होती. तर काही दिवसांपूर्वीच त्याचे वडील सलीम खान यांनीही मोदींचे कौतुक केले होते. त्यामुळे या सर्वांना निमंत्रण पाठवण्यात आले आहेत. या सर्वांबरोबरच लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर अशा अनेक दिग्गजांनाही मोदींनी आमंत्रण पाठवले आहे. आता कोणकोणते तारे मोदींच्या या सोहळ्याला 'चारचांद' लावतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.