आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशरत जहॉँ प्रकरणातील आरोपी अमजद अली बंटी नावाने मुंबईत राहायचा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - इशरत जहॉँ चकमक प्रकरणातील अन्य तीनपैकी एक आरोपी अमजद अली राणा मुंबईत जावेद शेखच्या घरी बंटी हे नाव धारण करून त्याच्या मित्राच्या रूपात राहिला होता, हे उघड झाले आहे. राणा मुंबईत बंटी नावाने राहत होता, असा उल्लेख सीबीआयच्या आरोपपत्रात आहे.


आरोपपत्रात 42 क्रमांकाची साक्षीदार शेखची पत्नी साजिदाची साक्ष नोंदवण्यात आली आहे. त्यात तिने राणाला पतीचा मित्र बंटी या नावाने ओळखले. जावेद दहशतवादी होता यावर विश्वास बसत नाही. तो एप्रिल महिन्यामध्ये ओमानला गेला होता. तेथून परतल्यानंतर त्याने 2.5 लाख रुपये, सॅटेलाइट फोन व काही मोबाइल फोन आणले होते. ही सर्व माहिती तिने जबाबात दिल्याचे आरोपपत्रात नमूद आहे.


इंडिकाची खरेदी : शेखने 1 लाख परत करून उर्वरित दीड लाखामध्ये निळी इंडिका कार खरेदी केली. चकमकीदरम्यान याच कारमध्ये गुजरात पोलिसांनी त्याला ठार केले होते. कार खरेदीच्या वेळी जावेदने बंटी नावाच्या मित्राची ओळख करून दिली. तो आमच्यासोबत काही दिवस राहत होता. अमजदचे छायाचित्र दाखवल्यानंतर तो बंटी असल्याची माझी ओळख पटली, असे साजिदाने म्हटले आहे.