आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amma is back twitter trolls jayalalithaa supporter bathes her picture in milk

PHOTOS: निर्दोष मुक्ततेनंतर जयललिता यांच्या पोस्टरला दुधाने अभिषेक, संसदेत समर्थकांनी वाटली मिठाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई/नवी दिल्ली - बेहिशेबी मालमत्ता साठवल्याप्रकरणी कर्नाटक हायकोर्टाने निर्दोष मुक्तता झाल्याने एआयएडीएमके प्रमुख जे. जयललिता यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला. बंगळूरू हायकोर्ट परिसरापासून ते चेन्नई येथील माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या घरापर्यंत प्रत्येक ठिकाणी एआयएडीएमके समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला. जयललिता यांना निर्दोष मुक्त केल्याने सोशल मेडियावर प्रतिक्रीयांचा पूरच आला. ट्वीटर आणि फेसबुक यांसारख्या सोशल साईट्सवर जयललिता यांच्याशी संबंधीत हॅशटॅग #JayaVerdict, #AmmaIsBack #MummyReturns ट्रेंडिंगमध्ये होते. चेन्नई समर्थकांनी जयललिता यांच्या पोस्टर्सला दुधाने आंघोळ घातली तर संसदेतील त्यांच्या समर्थकांनी मिठाई वाटली.

एआयएडीएमकेच्या वेबसाईटवर 'अम्मा इज बॅक'
हायकोर्टातून जयललीता यांची निर्दोश मुक्तता होताच एआयएडीएमकेच्या वेबसाईटवर 'अम्मा इज बॅक'चे पोस्टर झळकले. वेबसाईटवर ग्राफीक्सचा वापरकरून अम्मा यांच्या वापसीच्या घोषणा करण्यात आल्या. मिळालेल्या माहितीनुसार, जयललिता यांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर पक्षाने नव्याने ऑनलाईन मेंबर्स बनवण्यास सुरूवात केली आहे. पक्षाच्या वेबसाईटवर जयललिता यांच्या वक्तव्याचे पोस्ट सुध्दा करण्यात आले आहे, ज्यामध्ये त्यांनी स्वतःला राजकीय शडयंत्राचा बळी असे सांगितले आहे.
जयललिता यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर ट्वीटरवर अशा काही आल्या रिएक्शन्स
* Mayank Gandhi (AAP) @mayankgandhi04: Jayalalitha, Salman Khan etc.This is a rich man's country!!!!

* Kiran Bedi @thekiranbedi: Fuuuuullllllllll Maaaarrrrkkkkksssss Tooooo Oooouuuuurrr Judddddiiicccaiillll Ssssyyyttttemmss..Meraaa Bharat Mahaann. Jaaay..Hiiiiind...

* Ashwin S Kumar @ashwinskumar: So Lady Luck prostrates in front of Amma!

* Rajasekar ‏@drrsmd99: The best people to give surprises in India???? The indian judges #JayaVerdict

* Sakti ‏@_Sakti_: Now Paneerselvam would be weeping inside his house. JJ again took his chance of becoming CM #JayaVerdict

* @goyalsanjeev: One reason why today's #JayaVerdict has done more good than harm >> Saved 233+ lives! Thank you #HC for saving lives!

* @KiranKS: While common people aim for Tatkal tickets, rich actors and politicians get #TatkalJudgments.#SalmanVerdict #JayaVerdict

पुढील स्लाईडवर पाहा, जयललिता यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर समर्थकांच्या जल्लोषाचे PHOTOS...