आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजधानीच्या उभारणीसाठी शेतकऱ्यांनी देऊ केली 33 हजार एकर जमीन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
नवी दिल्ली - आंध्र प्रदेशची नवीन राजधानी अमरावतीसाठी शेतकऱ्यांनी ९० टक्के अर्थात ३८ हजार ५८१ एकर जमीन देऊ केली आहे, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली आहे. भूसंपादनासाठी आंध्र प्रदेशातील प्रक्रिया देशासाठी आदर्श पद्धती ठरेल, असा विश्वास नीती आयोगाने व्यक्त केला आहे.  

राजधानीच्या उभारणीसाठी शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने ३२ हजार ६३७ एकर जमीन देऊ केली आहे. ३८ हजार ५५८१ एकर जमिनीच्या संपादनाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यामुळे राजधानी अमरावतीच्या उभारणीच्या कामाला वेग आला आहे, अशी माहिती टी. श्रीनिवास राव यांनी दिली.
 
 एक हजार चौरस मीटरमध्ये २५० चौरस मीटरचा भाग व्यावसायिक वापरासाठी अनिवार्य करण्यात आला आहे. प्रतिएकर कोरडवाहू जमिनीसाठी ३० हजार रुपये तर निमशहरी जमिनीसाठी ५० हजार रुपये देऊ करण्यात आले आहेत.  
बातम्या आणखी आहेत...