आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य करायला शिका, बदल्या नकोत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस चांगलेच बिथरल्याचे पाहायला मिळू लागले आहे. केवळ अधिकार्‍यांच्या बदल्या करून चालणार नाही. राज्य करायला शिका, अशा शब्दांत काँग्रेस नेते अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांचे कान उपटण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रशासकीय पातळीवरील फेरबदलाची प्रक्रिया पंजाबमध्ये बुधवारी पार पडली. त्या पार्श्वभूमीवर अमरिंदर सिंग यांनी प्रकाश सिंग बादल यांना सुनावले.सत्ताधारी अकाली-भाजप आघाडीने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अतिशय वाईट कामगिरी केली होती. त्यानंतर प्रशासकीय पातळीवर बदल्या करण्यात आल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. हे म्हणजे बादल यांनी पराभवाचा सगळा राग अधिकार्‍यांवर काढल्याचे दिसते, असा टोला अमरिंदर यांनी मारला.
पंजाबमध्ये भाजप आघाडीला 13 पैकी 6 जागी विजय मिळाला. आपला चार ठिकाणी विजय मिळाला तर काँग्रेसला उर्वरित तीन जागी विजय मिळाला. दुसरीकडे इतर पक्षही बिथरल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. राजस्थानमध्ये लवकरच जिल्हा पातळीवरील पक्षाला संजीवनी देण्यासाठी काँग्रेसने बैठकीचे आयोजन केले आहे. माकप नेते सीताराम येच्युरी यांनी मोदींचे सरकार म्हणजे धार्मिक ध्रुवीकरणाला सुरुवात असल्याचे संकेत आहेत, अशा शब्दांत राळ उडवण्याचा प्रयत्न केला आहे. कलम 370 संबंधी पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री जितेंद्र सिंग यांच्या वादग्रस्त विधानाच्या संदर्भाने त्यांनी हा दावा केला.
गोव्यात ‘चौकशी समिती’
देशभरातील पराभव काँग्रेसला पचनी पडलेला दिसत नाही. त्यामुळेच गोव्यातील काँग्रेसने पराभवाची मीमांसा करण्याऐवजी उमेदवाराला पाडणार्‍या नेत्यांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शिस्तपालन समितीची स्थापना करण्यात आली आहे. रवी नाईक या उत्तरेतील बड्या नेत्यासह अनेकांची चौकशी होणार असल्याचे काँग्रेस प्रवक्ते सुनील कवठाणकर यांनी सांगितले.