आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

SURVEY: शहरी नागरिक वर्षाला 4400 रुपये लाच देतात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील भ्रष्टाचार आणि लाचखोरीशी संबंधीत एका सर्व्हेक्षणातून धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या सर्व्हेनूसार आपले काम करुन घेण्यासाठी शहरी कुटुंब साधारण 4400 आणि ग्रामीण भागातील परिवार 2900 रुपये वर्षाला लाच देण्यासाठी खर्च करतात. भ्रष्टाराच्या सर्वाधिक तक्रारी या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) असल्याचे सर्व्हेत म्हटले आहे.
नॅशनल काउंसिल ऑफ एप्लॉइड इकॉनॉमिक रिसर्चने (NCAER) लखनऊ, पाटणा, भुवनेश्वर, चेन्नई, हैदराबाद, पुणे या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात होत असलेल्या भ्रष्टाचाराचा खुलासा केला आहे. जनतेला सरकारी काम, शाळा-महाविद्याल प्रवेश आणि पोलिसांशी संबंधीत कामासाठी सर्वाधिक लाच द्यावी लागते, असे या अहवालात म्हटले आहे. शहरात नोकरी, बदली, पोस्टींग यासाठी एक कुटुंब वर्षाला 18000 आणि पोलिस, वाहतूक पोलिस यांना 600 रुपये लाच देतात.
मनरेगामध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार
सर्व्हेनुसार ग्रामीण भागात राबवण्यात येत असलेली मनरेगा ही योजना भ्रष्टाचाराचे कुरण आहे. ग्रामीण जनतेला मनरेगा, अन्न सुरक्षा योजना, इंदिरा आवास योजना आणि शिष्यवृत्ती या सारख्या योजनांसाठी लाच द्यावी लागते. काळा पैसा जमा करण्याचे सर्वात मोठे साधन भ्रष्टाचार असल्याचेही सर्व्हेत म्हटले आहे.
केव्हा आणि कुठे झाले सर्व्हेक्षण
हे सर्व्हेक्षण उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, तमिळनाडू, आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्रातील पुण्यात करण्यात आले. 2012 यावर्षी सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान हे सर्व्हेक्षण झाले होते. तर याचा अहवला 2013-14 मध्ये अर्थ मंत्रालयाला देण्यात आला होता. तो आता उघड करण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...