आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहे बाउन्सर्सचे गाव; येथे 56 इंच छाती असते किमान पात्रता!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीच्या कुतुबमिनारपासून ८ किलोमीटर अंतरावर जुळी गावे आहेत. असोला-फतेहपूर बेरी. या दोन्ही गावांना एक कच्चा रस्ता विभागतो. एका बाजूला असोला, तर दुसरीकडे फतेहपूर बेरी गाव.

५६ इंची छाती असलेला तरुण ही येथील किमान पात्रता आहे. गेल्या १५ वर्षांपासून पहिलवानांचे गाव म्हणून याची ख्याती आहे. येथील ३०० पेक्षा अधिक युवक विविध ठिकाणी बाउन्सर म्हणून काम करतात. या गावाची लोकसंख्या ५००० आहे. येथील पहिले बाउन्सर होते विजय पहिलवान. आपण अन्य पर्याय नसल्याने बाउन्सर झाल्याचे ते सांगतात. वडिलांच्या मृत्यूनंतर सर्व जबाबदारी आपल्यावर आली. विजय काम करत असलेल्या ठिकाणच्या मालकाने म्हटले, शरीरयष्टी तगडी आहे, बाउन्सर का होत नाहीस? केवळ शरीरसौष्ठव दाखवायचे असते. काम इतकेच. मी या क्षेत्रात आलो आणि इतर युवकांनाही यासाठी प्रोत्साहित केल्याचे त्यांनी सांगितले. गावाला रोजगाराचे एक साधन मिळाले.
काही दशकांपूर्वी गुडगाव विकसनशील होते, असे गावातील जितेंद्र कुमार यांनी सांगितले. पब-रेस्टो आणि मॉल संस्कृती रुजत होती. त्यामुळे बाउन्सर्सना मागणी वाढली. असोला-फतेहपूरहून अनेक जण येथे बाउन्सर म्हणून काम करू लागले. गावात ही प्रथा रुजली. तरुण म्हणजे ६० इंची छाती आणि १८ इंची बाहू असे समीकरण झाले. काळाप्रमाणे यात बदलही होत असल्याचे कन्नू तंवर यांनी सांगितले. बाउन्सरव्यतिरिक्तही या क्षेत्रातील संधी तरुण शोधत आहेत. मॉडेलिंग, जाहिराती, मिस्टर दिल्ली वा राजस्थानसारख्या स्पर्धांतही तरुण जात आहेत. २०१३ मधील मिस्टर दिल्ली स्पर्धेत कन्नू तंवर यांनी द्वितीय स्थान पटकावले. बाउन्सर झाल्यावर अनेक जणांशी संपर्क वाढतो, असे ईश्वर आणि मंजीश तंवर यांनी सांगितले. त्यामुळे नोकरीच्या अधिक चांगल्या संधीही मिळतात. कृष्णपाल गंजू व्यवसायाने वकील आहेत. ते सांगतात की, अनेकदा हिंसेसाठी बाउन्सर्सना जबाबदार धरले जाते. त्यांच्या वतीने मी खटला लढतो. बाउन्सर बनणे फार सोपे नाही. त्यासाठी दररोज ४-५ तास अाखाडा व जिममध्ये मेहनत घ्यावी लागते, असे जितेंद्र कुमार यांनी सांगितले.
आहारही त्यानुसारच घ्यावा लागतो. क्रोध आवरण्याचे प्रशिक्षणही विजय पहिलवान तरुणांना देतात. केवळ शरीराची जरब दाखवणे पुरेसे असल्याचे ते म्हणतात. गावातील आखाड्यात गुरू लेखराज प्रशिक्षण देतात. गावात ५ जिम सुरू करण्यात आले आहेत. मुलींसाठीही १ जिम सुरू केले आहे. येथे मोनिका प्रशिक्षण देतात. युवकांचे पाहून कुटुंबातील महिलाही आरोग्याविषयी सजग झाल्याचे मोनिका यांनी सांगितले. गावात पडदा पद्धत असल्याने मुलींसाठी स्वतंत्र जिम सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.
गावात ६ व्यायामशाळा, यातील ५ फक्त मुलांसाठी
- १५ वर्षांपूर्वी बाउन्सरची प्रथा सुरू झाली. ती सध्या वाढतच आहे.
- दिल्ली आणि गुडगावमध्ये श्रीमंत, उद्योजकांकडून मिळतात नोकऱ्या.
- आता बाउन्सर जाहिराती करतात. सैन्य व सुरक्षा दलातही नोकरी करतात.
- बाउन्सर्सना सुरुवातीला १५ हजार आणि अनुभवाप्रमाणे ४० हजारांपर्यंत वेतन मिळते.
- गावातील मुलीही जिमसाठी सरसावल्या. मात्र, अद्याप कोणाची निवड झालेली नाही.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, कशी कसरत करतात युवक..