आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्लेषण : याचे \'बिहार\' ऐसे नाव... या राजकीय आखाड्यात काहीही घडू शकते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - सोनिया गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत लालूप्रसाद यादव, सोनिया गांधी आणि शरद यादव यांनी बराच वेळ चर्चा केली.
लोकसभा निवडणुकांनंतर देशातील सर्वच राज्यांमधील राजकीय गणिते बदलली असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. जयललितांचे तामिळनाडू, ममतांचे पश्चिम बंगाल आणि नवीन पटनायक यांचे ओरिसा ही राज्ये त्याला अपवाद असला तरी, इतर अनेक राज्यांत राजकीय भूकंपाची परिस्थिती निर्माण झाली. त्यापैकी उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रानंतर मोठा धक्का बसलेले राज्य म्हणजे बिहार. काही वर्षांपूर्वी लालूंचे आणि सुमारे गेल्या दशकभरापासून नितीश कुमार यांचे वर्चस्व असलेल्या या राज्यातील सर्व गणितेही बदलून गेली. या बदललेल्या गणितांमधून काहीशी जुनीच पण तरीही नवी अशी एक आघाडी रुप घेत आहे. पण या आघाडीचे भविष्य मात्र धोक्यात असल्याचेच चित्र आहे. त्याचे कारण म्हणजे या तिन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्ते एकमेकांबरोबर काम करण्यासाठी तयार नाही. आघाडी झाल्यानंतर नेत्यांच्या आदेशाने ते कदाचित आघाडीप्रमाणे काम करतीलही. पण मग त्यावेळी जुने राजकीय वितुष्ट त्यांना एकमेकांच्या विरोधात उभे करून छुपा विरोध करण्यास भाग पाडणार ही शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या सुमारे तीन-ते चार महिन्यांपूर्वीपासून घोंगावत असलेल्या मोदी लाटेला थोपवण्याची क्षमता ही आघाडी निर्माण करू शकेल, अशी शक्यता मात्र वाटत नाही... त्यामुळे निवडणुका होईपर्यंत तयार होणारी गणिते या सर्वामध्ये महत्त्वाची ठरणार आहेत. कारण हे बिहार आहे...येथे काहीही घडू शकते.
पुढील स्लाइड्सवरून जाणून घ्या बिहारची राजकीय परिस्थिती आणि नव्या आघाडीबाबत....