आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विश्लेषण : देश जिंक‌ण्यासाठी तत्त्वांना दूर ठेवणारे माेदी!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ‘मिनिमम गव्हर्नमेंट, मॅक्झिमम गव्हर्नन्स’ हे ब्रीद अनेकदा एेकवणारे पंतप्रधान नरेंद्र माेदी परिस्थितीनुरूप बदलले अाहेत. अातापर्यंत कधी नव्हे ते एवढे जम्बाे मंत्रिमंडळ करून त्यांनी स्वत:च्याच तत्त्वाला केराची टाेपली दाखवली. खरे तर अाजच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावर दृष्टिक्षेप टाकला तर केवळ मतांच्या राजकारणासाठी माेदींना परिस्थितीने कसे बदलवले हे दिसून येते. तसेही माेदींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्र्यांना करण्यासारखे काहीच नाही. याचे उदाहरणच द्यायचे झाल्यास माेदींची पंतप्रधान म्हणून शपथ झाल्याच्या दिवशीच रावसाहेब दानवे यांनीही राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली हाेती. दानवे पहिल्या दाेन महिन्यांतच वैतागले हाेते. टेबलवर काम काहीच नाही, फाइलही येत नाही; मात्र काेणते मंत्री किती वाजता कार्यालयात अाले याचा अाढावा पंतप्रधान कार्यालयातील बाबू घेत असल्याने अनेकांना कासावीस व्हायला लागले हाेते. दानवे यांनी पक्षाध्यक्षपदाची संधी मिळवून मंत्रिपदाचा त्याग केला. दानवेंची जी स्थिती हाेती तीच स्थिती अन्य राज्यमंत्र्यांची अाहे. अाज अनेक राज्यमंत्री असे अाहेत की ते केवळ त्यांच्या मतदारसंघात लाल दिव्याची गाडी घेऊन फिरतात. अाज सांवरलाल जाट, रामशंकर कथेरिया, निहालचंद, मनसुखभाई वसावा, एम.के.कुंडारिया या पाच मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात अाले. खरे तर हे मंत्री हाेते का, इथपासून दिल्लीतील वर्तुळात चर्चा अाहे. त्यांचे चेहरेही अाेळखीचे वाटत नव्हते. अशीच स्थिती अन्य राज्यमंत्र्यांची अाहे. काेळसा घाेटाळा बाहेर अाणणारे हंसराज अहिर हे राज्यमंत्री असले तरी अाठवड्यातील चार दिवस ते मतदारसंघ िकंवा दिल्लीच्या बाहेर असतात. त्यांना दिल्लीत थांबण्याची गरज यासाठी नाही की मंत्रालयात त्यांना काही करण्यासारखी त्यांच्यावर जबाबदारीच नाही. प्रकाश जावडेकर अाणि पीयूष गाेयल यांच्यासारखे कर्तव्यदक्ष मंत्री अापली कल्पकता लावून माेदींच्या गळ्यातील तार्इत झाले अाहेत. ते प्रत्येकाला जमेलच असे नाही.
अाज विस्तारात १९ जणांचा समावेश झाला. त्यातील अर्जुन राम मेघवाल, एस.एस.अहलुवालिया, एम.जे.अकबर, विजय गोयल, अनिल माधव दवे ही पाच नावे साेडली तर अन्य राज्यमंत्र्यांची स्थिती दानवेंसारखीच हाेणार अाहे. केवळ मतांचे राजकारण, जातीय समीकरण या अाधारावरच ही नियुक्ती दिसून येते. विनय सहस्रबुद्धे यांच्यासारखा ज्ञानयाेद्धा खासदारकीची तीन वेळा हुलकावणी खाताे, तिथेही जातीचेच राजकारण हाेते. अाता त्यांना विस्तारात संधी देत माेजक्या सक्षम मंत्र्यांत भर टाकण्याची जी रणनीती पक्षाने अाखली हाेती ताे निर्णयही बदलावा लागला. छाेटेसे परंतु उत्तम सरकार या माेदींच्या संकल्पनेवर अाजच्या विस्तारानंतर पाणी फेरले गेले अाहे. परंतु माेदींची ही रणनीती देश जिंकण्यासाठीची अाहे. डाॅ. सुभाष भामरे यांना मंत्रिपद दिल्याने ए.टी.नाना पाटील, संजय धाेत्रे, संजयकाका पाटील, हरिश्चंद्र चव्हाण, दिलीप गांधी यांच्यातील अस्वस्थता वाढली अाहे, चार घरे फिरून येणाऱ्यांना पक्ष संधी देताे. अाम्ही कसे वागायचे, हा प्रश्न नाराज खासदारांचा अाहे. डाॅ. भामरे यांचा विस्तारात समावेश करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनेकांना धाेबीपछाड द्यायची हाेती, त्यात ते यशस्वी झालेत!

मोदी सरकारमधील नव्या मंत्र्यांचा परिचय
निवडणुकांचे लक्ष्य ठेवूनच पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी जातीय समीकरणासह राज्यनिहाय मंत्रिमंडळाचा विस्तार केला अाहे. मंगळवारी झालेल्या मंत्र्यांचा परिचय थाेडक्यात पुढीलप्रमाणे-
>डॉ. सुभाष भामरे - उत्तर महाराष्ट्रातील धुळ्याचे खासदार, रावसाहेब दानवेंच्या रिक्त जागेवर मराठा समाजाचे प्रतिनिधी, खडसे प्रकरणानंतर या भागातील समताेल साधण्याचा प्रयत्न.
>रामदास आठवले – महाराष्ट्रात शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात सामाजिक न्यायमंत्री, आंबेडकरी चळवळीतला एकमेव चेहरा, दलित पँथर चळवळीपासून सक्रिय राजकारणात सहभाग.
>अर्जुन राम मेघवाल - माजी आयएएस अधिकारी, भाजपचे लोकसभेतील प्रतोद, राजस्थानातील दलित चेहरा.
>पुरुषोत्तम रूपाला - राज्यसभा सदस्य, सौराष्ट्रात पटेल समाजाचे प्रमुख नेते, अमित शहा यांचे जवळचे.
>एस.एस.अहलुवालिया - माजी संसदीय कार्य राज्यमंत्री, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, दार्जिलिंगचे लोकसभा सदस्य, भाजपचा अल्पसंख्य शीख समुदायातला एकमेव चेहरा
>एम.जे.अकबर – राज्यसभा सदस्य, सुविख्यात पत्रकार, भाजपचे प्रवक्ते, भाजपचा अल्पसंख्य मुस्लिम चेहरा.
>महेंद्रनाथ पांडे - उत्तर प्रदेशातील ब्राह्मण समाजाचे नेते, हिंदी विषयात डॉक्टरेट.
>अनुप्रिया पटेल - उत्तर प्रदेशात कुर्मी पटेल समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्व. सोनेलाल पटेलांच्या कन्या. अपना दलाच्या नेत्या.
>विजय गोयल - राज्यसभा सदस्य, दिल्लीतले भाजपचे अाक्रमक नेते, वाजपेयी सरकारमध्ये राज्यमंत्री.
>अजय टम्टा - अल्मोडाचे खासदार, उत्तराखंडातील तरुण दलित नेते.
>अनिल माधव दवे - मूळचे आणंद (गुजरात)चे, रा.स्व.संघाचे प्रचारक, साहित्यिक.
>पी.पी.चौधरी - चार लाखांपेक्षा अधिक मतांनी पाली राजस्थान येथून लोकसभा निवडणुकीत विजय.
>मनसुखभाई मंडाविया - गुजरात भाजपचे महासचिव, सौराष्ट्रात भाजप मजबूत करण्यात पुढाकार, पंतप्रधान मोदी यांचे निकटवर्ती.
>फग्गनसिंग कुलस्ते - अनुसूचित जमातीतले आदिवासी नेते, वाजपेयी सरकारमध्ये राज्यमंत्री, संसदेतल्या नोट फॉर व्होट वादग्रस्त प्रकरणात सहभागी
>सी.आर.चौधरी - राजस्थानच्या नागौर मतदारसंघाचे खासदार, ग्रामविकास विषयात बर्मिंगहॅम विद्यापीठाचे स्नातक
>कृष्णा राज - भूसंपादन विधेयकासाठी नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीच्या सदस्या, भाजपच्या दलित नेत्या, उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरच्या दुसऱ्यांदा खासदार.
>रमेश चंदप्पा जिगाजिनागी - भाजपचे कर्नाटकातील दलित नेते, विजापूर मतदारसंघातून ५ वेळा लोकसभेवर निवड.
>जसवंतसिंग भाभोर - अनुसूचित जमातीचे आदिवासी नेते, दाहोद मतदारसंघाचे खासदार.
>राजन गोहेन - नौगांवचे लोकसभा खासदार, सर्बानंद सोनोवाल यांच्या रिक्त जागेवर आसामचे प्रतिनिधित्व.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...