आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 राज्यातील बडे चेहरे: UP मध्ये 14 वर्षांपासून सत्तेबाहेर असलेल्या BJP कडे नाही CM उमेदवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - निवडणूक आयोगाने आज (बुधवार) पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशात सत्ताधारी समाजवादी पक्षात यादवी माजली आहे. पक्षाचे अधिकृत चिन्ह सायकलवर कोणाला मिळते याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. येथे भाजप 14 वर्षांपासून सत्तेबाहेर आहे. मायावती समाजवादीमधील यादवीचा फायदा उचलण्याची संधी नक्कीच सोडणार नाहीत. पंजाबात भाजप सोडून काँग्रेसचा हात पकडलेले नवज्योतसिंग सिद्धू काय चमत्कार करतात हे पाहाणे औत्सूक्याचे आहे. उत्तराखंड-मणिपूरमध्ये काँग्रस सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी होते की ही छोटी राज्येही गमावून बसते याकडे सर्वांचे लक्ष्य आहे. या सर्व राज्यांमध्ये भाजप मोदींना पुढे करुनच निवडणूक लढविणार हे निश्चित आहे. 
 
यूपीच्या अखाड्यातील 5 चेहरे 
 
मोदी 
- 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने येथील 80 लोकसभा मतदारसंघापैकी 71 जागांवर विजय मिळविला होता. हे पाहाता भाजप पुन्हा एकदा मोदी लाटेवर स्वार होण्याची तयारी करत करत आहे. मोदी येथे विकासाच्या मुद्द्यावर मतदारांना आकर्षित करण्यात कितपत यशस्वी होतात ते पाहावे लागेल. कारण नुकताच नोटबंदीचा चटका सामान्य आणि मध्यमवर्गीयांना बसला आहे. 
- दिल्ली, बिहार आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मोदी फॅक्टर अपयशी ठरला आहे. दुसरीकडे आसाम या छोट्या राज्यात त्यांनी मात्र कमाल दाखवत पूर्वोत्तर राज्यांमध्ये प्रथमच स्वबळावर सत्ता काबिज केली आहे. 
 
अखिलेश यादव 
- उत्तर प्रदेशचे तरुण मुख्यमंत्री अखिलेश यादव हे स्वतःच्या कामाच्या जोरावर जनतेमध्ये जाणार आहेत. युवकांमध्ये ते विशेष लोकप्रिय असून तरुणांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास आहे. पाच वर्षांच्या सरकारच्या कामाच्या जोरावर ते मतदारांकडे मतांचा जोगवा मागतिल. 
- अखिलेश यांच्या मार्गातील सर्वात मोठा अडसर त्यांचा यादव परिवारच राहाणार आहे. ही बातमी लिहित असताना समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यांनी लखनऊमधून धाकट्या सूनेला- अपर्णा यांना उमेदवारी दिली आहे. अखिलेश यांच्या सावत्र भावाची ती पत्नी आहे. 
- यादवांमधील यादवीचे आव्हान अखिलेश कसे पेलतात यावरच त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. 
 
मायावती 
- उत्तर प्रदेशमध्ये 2002 पासून अर्थात 14 वर्षांपासून एकतर बहुजन समाज पक्ष किंवा समाजवादी पक्ष सत्तेत आहे. मायावती यांचे फॉलोअर्स मोठ्या प्रमाणात आहे. 
- राज्यातील कायदा-सुव्यवस्था, जात फॅक्टर हा बसपाच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा राहाण्याची शक्यता आहे. यावरुन मतदार मायावतींवर विश्वास दाखवण्याची दाट शक्यता आहे.
- दुसरीकडे, मायावतीसाठी चिंतेची बाब म्हणजे लोकसभा निवडणुकीत राज्यात त्यांचे खाते देखिल उघडले नाही. 
- समाजवादी मधील यादवी, भाजपकडे मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराचा आभाव, विरोधकांच्या या कमकुवतबाजूचा मायावती कसा फायदा उचलतात यावर बरेच काही अवलंबून आहे. 
 
मुलायमसिंह 
- मुलायमसिंह त्यांचा मुलगा अखिलेश यांच्यापेक्षा वेगळी भूमिका घेण्याची शक्यता आहे. अखिलेश विकास आणि पाच वर्षातील कामाच्या जोरावर मते मागतिल तर मुलायमसिंह यादव-मुस्लिम फॅक्टर कॅश करण्याची शक्यता आहे. 
- समाजवादी पक्षाच्या पारंपरिक मतदारांमध्ये मुलायमसिंह यांची पकड अखिलेश यांच्यापेक्ष घट्ट आहे. 
 
प्रियंका गांधी 
- असे मानले जाते की उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस फक्त मत विभाजनाचे काम करणार आहे. मात्र जर प्रियंका गांधी यांनी पुढाकार घेऊन प्रचार केला तर काँग्रेसच्या काही जागांवर निश्चित सकारात्मक परिणाम दिसेल. 
 
पुढील स्लाइडमध्ये, पंजाबात यांची भूमिका ठरणार महत्त्वाची   
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...