आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ANALYSIS: काय आहे बुलेट ट्रेन प्रोजेक्ट? खरंच याची देशाला गरज आहे का?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मुंबई-अहमदाबाद दरम्यान 2022 पर्यंत बुलेट ट्रेन धावण्याची शक्यता आहे, तसे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. 508 किलोमीटरचे हे अंतर ही ट्रेन अवघ्या तीन तासांत कापणार आहे. सध्या दुरांतो रेल्वेने हे अंतर कापायला साडेपाच तास लागतात. बुलेट ट्रेन प्रकल्पाचा एकूण खर्च 1.20 लाख कोटी रुपये आहे. म्हणजेच प्रत्येक किलोमीटरसाठी 236 कोटी रुपये खर्च येणार आहे. दोन शहरे जोडण्यासाठी एवढा मोठा खर्च कशाला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. देशाला आणि मुंबई-अहमदाबादला खरचं या ट्रेनची एवढी आवश्यकता आहे का? हाच खर्च हवाई वाहतुकीच्या पायाभूत सुविधांवार खर्च केला तर अधिक फायदा होणार नाही का? 
DivyaMarathi.com ने याच प्रश्नांची उत्तरे रेल्वे बोर्डाचे माजी चेअरमन अरुणेंद्र कुमार आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट अँड रिसर्चचे डीन डॉ. जनार्दन कोनेरे यांच्या मदतीने जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
 
सर्वप्रथम जाणून घेऊ या, काय आहे बुलेट ट्रेन प्रकल्प 
- मुंबई - अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे (MAHSR)या नावाने हा प्रकल्प सुरु होत आहे. याचा एकूण खर्च 1.20 लाख कोटी रुपये असणार असून जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांच्या हस्ते त्याची कोनशिला ठेवण्यात आली. मुंबई - अहमदाबाद हे 508 किलोमीटरचे अंतर असून ही ट्रेन तीन तासांत पूर्ण करेल. हा प्रकल्प 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. 
 
12 स्टेशन, 350 kmph स्पीड, 3 तासांचा प्रवास 
- मुंबई-अहमदाबाद मार्गावर बुलेट ट्रेनचा ताशी वेग 350 किलोमीटर राहील. सध्या या मार्गावर साधारण रेल्वेने 7-8 तास लागतात. 
- जर बुलेट ट्रेन 12 स्टेशनवर थांबणार असेल तर 508 किलोमीटर अंतर 3 तासांत पूर्ण करेल. म्हणजे सरासरी स्पीड ताशी 170 किमी राहील.
- जर मुंबई, अहमदाबाद, सूरत आणि बडोदा या चार स्टेशनवर फक्त थांबा असेल तर दोन तासांत हे अंतर पूर्ण करेल. अशा परिस्थितीत ताशी वेग 254 किलोमीटर राहील. 
- या मार्गावर  मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलिमोरा, सूरत, भरुच, बडोदा, आणंद, अहमदाबाद आणि साबरमती हे स्टेशन असू शकतात. यातील मुंबई स्टेशन हे अंडरग्राऊंड राहाणार आहे. 
- बुलेट ट्रेनचा मुंबईतील 7 किलोमीटरचा मार्ग हा समुद्राखालून राहाणार आहे. 
- 508 किलोमीटरमधील 351 किलोमीटर मार्ग हा गुजरातमधील असेल तर 157 किमी महाराष्ट्रातून धावणार आहे. एकूण लांबीच्या 92% अर्थात 468 किमी लांबीचा ट्रॅक एलिव्हेटेड असणार आहे. 
- बुलेट ट्रेन 70 हायवे, 21 नद्या पार करणार आहे. मार्गात 173 मोठे आणि 201 छोटे पूल असतील. 
- बुलेट ट्रेनची सुरुवात 10 कोचच्या रेल्वेने होणार आहे. त्यात 750 आसन क्षमता असेल. त्यानंतर 1200 आसन क्षमतेची 16 कोचची ट्रेन धावेल. ट्रेनने रोज 36,000 प्रवाशी प्रवास करतील. ट्रेन रोज 35 फेऱ्या मारणार आहे.
 
ANALYSIS: बुलेट ट्रेनवर उपस्थित होणारे 4 प्रश्न 
 #1 - बुलेट ट्रेनवर जेवढा खर्च होत आहे त्यात 80 नवे एम्स हकॉस्पिटल उभे राहू शकतात? 
 - प्रत्येक किलोमीटरवर ट्रेन, ट्रॅक आणि पायाभूत सुविधांवर 236 कोटी रुपये खर्च होणार. बुलेट ट्रेनचा संपूर्ण खर्च 1.20 लाख कोटी रुपये आहे. एवढ्या पैशांमध्ये देशात 80 नवे एम्स तयार होऊ शकतात. एका एम्स हॉस्पिटलचा खर्च 1500 कोटी रुपये. 
 - 1.20 लाख कोटी रुपये हा आकडे पाच वर्षातील रेल्वे सुरक्षा फंड एवढा आहे, वाढत्या अपघातांमध्ये येथे हा खर्च होणे अधिक गरजेचे आहे. 
- 300 प्रलंबित प्रकल्पांसाठी रेल्वेला 2 लाख कोटी रुपयांचा आवश्यकता आहे. बुलेट ट्रेनच्या खर्चात रेल्वेचे 150 प्रलंबित प्रकल्प मार्गी लागू शकतात.  
EXPERT VIEW
रेल्वे बोर्डाचे माजी अध्यक्ष अरुणेंद्र कुमार : या प्रकल्पामध्ये रेल्वेची फक्त जमीन आहे. 1.20 लाख कोटी रुपये खर्चातील 88% जपान सरकार देणार आहे, तेही 0.1% व्याज दराने. कोणत्याच प्रकारे हा सौदा भारतासाठी तोट्याचा नाही. रेल्वे सुरक्षेवर तुम्ही प्रश्न उपस्थित केला, त्यावर चांगले काम सध्या सुरु आहे. सुरेश प्रभूंचे दुर्देव की अपघातांची संख्या वाढली. 
- डीन डॉ. जनार्दन कोनेर : भारतीय अर्थव्यस्थेचा विचार केला तर सध्याच बुलेट ट्रेनची आम्हाला गरज नाही. पुढील 10 वर्षांनी याची गरज भासू शकते. मात्र एक आहे की जर हॉस्पिटल्समध्ये गैरकारभार जास्त दिसायला लागला तर आम्ही नवीन हॉस्पिटल तयार करणे थांबवतो का, तर नाही. त्याच न्यायाने बुलेट ट्रेनला नाके मुरडे योग्य नाही. जर 10 वर्षे आधी सुरुवात होत असेल तर त्यात गैर काय आहे. 
 
 #2 - 25 रेल्वे, 20 पेक्षा जास्त फ्लाइट्स... मग बुलेट ट्रेनची गरज काय? 
 सध्या काय सुविधी :  मुंबई- अहमदाबाद या दोन्ही शहरांदरम्यान सध्या 25 रेल्व, 20 पेक्षा जास्त फ्लाइट्स आहे. 40 पेक्षा जास्त ट्रॅव्हल कंपन्यांच्या 95 व्हॉल्वो, डिलक्स बस सेवा सुरु आहे. 
 रेल्वेने काय विचार केला असेल : रेल्वेने विचार केला असेल की 2023 पर्यंत दोन्ही शहरांदरम्यान दीड कोटी लोकसंख्या प्रवास करेल. म्हणजे 41 हजार लोक रोज या मार्गावर प्रवास करणार. त्यातील 36 हजार प्रवाशांची गरज बुलेट ट्रेन पूर्ण करु शकते. 
 EXPERT VIEW
 - डॉ. जनार्दन कोनेर : बुलेट ट्रेनच्या पायाभूत सुविधांवर नक्कीच मोठा खर्च करावा लागतो, मात्र मेन्टेनन्स कॉस्टचा विचार केला तर एअर ऑपरेशन्सपेक्षा तो कमी आहे. जर तुम्हाला विमानाने रोज 36 हजार प्रवाशांना घेऊन उड्डाण करायचे असेल तर कदाचि तुम्हाला आणखी विमानतळांची गरज भासू शकते. किमान नवीन हवाई पट्टी तरी तयार करावी लागेल, खर्च तर तिथे ही लागणार आहे.
 
#3 - दुरांतो स्वस्त मग बुलेट ट्रेनचा फायदा काय, वेळ हवाई प्रवासापेक्षा जास्त? 
 - बुलेट ट्रेनचा किराया 2700 ते 3000 रुपयांदरम्यान राहील आणि वेळ तीन तास. 
 - सध्या या मार्गावर दुरांतोचे तिकीट 2000 रुपये आहे. या रेल्वेने साडे पाच तास लागतात. 
 - मुंबई-अहमदाबाद चे एक महिन्यानंतरचे एअर फेअर 1500 आणि काही दिवसानंतरचे 4000 रुपये आहे. वेळ एक तास 10 मिनिट. 
 - व्हॉल्वो बसचे तिकिटी 1000 रुपयांपासून 531 रुपयांपर्यंत. वेळ 10 तास लागतात. 
EXPERT VIEW
- अरुणेंद्र कुमार : तुम्ही जर विमानतळावर जाणे, बोर्डिंग पास, सुरक्षा तपासणी असा सर्व वेळ एकत्रित केला तर हा प्रवास तीन किंवा कदाचित त्यापेक्षा जास्त होतो. बुलेट ट्रेनने तुम्ही 10 मिनिट आधी स्टेशनवर पोहोचले तरी ट्रेन पकडू शकता. यामध्ये फ्लाइट पेक्षा जास्त सामान वाहून नेऊ शकता. 2022 मध्ये कदाचित फ्लाइट पेक्षा कमी तिकिट लागू शकते. 
 
 #4 - भारताला खरच या प्रकल्पाची गरज आहे? 
- असे मानले जात आहे की हा प्रकल्प 160 वर्षांच्या रेल्वेमध्ये क्रांती आणणारा ठरणार आहे. सुरुवातीच्या काळात या प्रकल्पात 20 हजार लोकांना रोजगाराची संधी मिळेल. 
- या प्रकल्पांतर्गत जेव्हा मेक इन इंडिया प्रमाणे रेल्वे भारतात तयार होण्यास सुरुवात होईल तेव्हा इतर मार्गांनाही त्याचा फायदा होईल. तिथे कमी खर्चात हाय स्पीड रेल्वे कॉरिडोर तयार केले जातील. 
EXPERT VIEW
- अरुणेंद्र कुमार :  बुलेट ट्रेन भारतासाठी क्रांती ठरणार आहे. यामुळे दोन ठिकाणांमधील अंतर कमी होऊन वेगाने पोहोचता येणार आहे. वेळेची मोठी बचत होईल.  हा प्रकल्प भारतात होत असल्याने हेच मोठे आव्हान आहे दुसरी जमेची बाजू म्हणजे या क्षेत्रातील तज्ज्ञ असलेला जपान आपल्या सोबत आहे. 
- डॉ. जनार्दन कोनेर: बुलेट ट्रेनने प्रवास करणाऱ्या लोकांचा त्यांच्या कामावर परिणाम जाणवतो. यामुळे देशातील वर्कफोर्सला हॅपी फॅमिली लाइफ एन्जॉय करता येईल. याचा परिणाम अर्थव्यवस्थेवरही होईल. एक नक्की आहे की जर प्रवासी मिळाले नाही तर सरकारला बराच काळ यासाठी अनुदान द्यावे लागेल. प्रवाशी मिळाले तर गुंतवणुकीचा खर्च वसूल होईल. 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, मोदींनी पाहिली होती जपानची बुलेट ट्रेन... 
बातम्या आणखी आहेत...