आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: या चिमुकल्याच्या जिद्दीला सलाम, हात-पाय नसतानाही भल्याभल्यांना शिकवली \'अक्कल\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माणसाला शारीरिक व्याधी असो, अपंगत्व असो, जवळचे कुणी नसो, एवढेच काय तर खिशात दमडीही नसो पण तरीही केवळ जिद्दीच्या जोरावर कोणत्याही मोठ्या संकटावर मात करते येते हे या चिमुकल्याने सिद्ध करुन दाखवले आहे.
 
चार वर्षाच्या या चिमुकल्याचे नाव कॅमडीन व्हिडन असे आहे. जन्मताच त्याला दोन्ही हात आणि पाय नाहीत. तरीही आई केटी कॅमडीन हिने दिलेले भरभरुन प्रोत्साहन आणि या चिमुकल्याची अतुलनीय जिद्द, चिकाटी याच्या बळावर मोठमोठ्या संकटांवर मात करण्याची उर्मी त्याने जागवली आहे. एखादे फुटकळ कारण समोर करुन एखादी गोष्ट साकारता येणार नाही असे म्हणून पळवाट काढणाऱ्या लोकांच्या मुस्काटात या चिमुकल्याने मारली आहे.
 
हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करत महिंद्रा आणि महिंद्रा या आघाडीच्या कंपनीचे कार्यकारी चेअरमन आनंद महिंद्रा म्हणाले, की At first, I couldn't bear to look, and then, I was left feeling uplifted. I don't think I will ever complain again about any job being too hard. (पहिल्यांदा, मी हा व्हिडिओ अगदी सहजपणे बघू शकलो नाही. त्यानंतर, मला अगदी उंचावल्यासारखे वाटले. एखादे काम खरंच कठिण आहे अशी तक्रार आता मी कधी करणार नाही.)
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या चिमुकल्याने अशी केली संकटावर मात... बघा इन्स्पिरेशनल व्हिडिओ... तुम्हालाही आयुष्यातील संकटांवर मात करण्याची मिळेल प्रेरणा....
बातम्या आणखी आहेत...