आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परंपरेच्या नावाखाली आपल्याच मुलांचा बळी घेत आहेत अंदमानातील जारवा आदिवासी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- जावरा आदिवासींच्या मुलांच्या हत्याकांडाप्रकरणी अंदमानातील पोलिस सध्या त्रस्त आहेत. मुलांची हत्या करणारे दुसरे -तिसरे कोणी नसून जावरा आदिवासीच आहेत. परंपरा कायम ठेवण्याच्या नावाखाली तेच हे अमानवी कृत्य करत आहेत. जावरा आदिवासींवर कारवाई करावी, की त्यांना संरक्षण द्यावे, असा प्रश्न आता पोलिसांना पडला आहे.

जारवा आदिवासींच्या परंपरेनुसार, ज्या मुलांची आई विधवा असते किंवा त्यांचे वडिल इतर समाजातील असतात, अशा मुलांची हत्या केली जाते. जावरा आदिवासींच्या घरात जन्माला आलेले मुल हे काळ्या रंगाचे असावा. मुलाचा वर्ण गोरा आढळल्यास समाजातील लोक त्याची हत्या करून टाकतात. परंपरेंच्या नावाखाली जावरा आदिवासी आपल्याच मुलांच्या मानगुटीवर बसत असल्याचे समोर आले आहे.

मागील काही महिन्यांपासून मुलांच्या हत्येची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे अंदमान पोलिस चांगलेच अडचणीत सापडले आहे. कारवाई कोणावर करावी व संरक्षण कोणाला द्यावे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, काय आहे संपूर्ण प्रकरण...?
बातम्या आणखी आहेत...