आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Andhra Pradesh Protest News In Marathi, Divyamarathi

स्वतंत्र तेलंगणाविरोधात सीमांध्रमध्ये कडकडीत बंद; रेड्‍डींसह सहा मंत्र्यांचा राजीनामा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद- केंद्र सरकारने मंगळवारी स्वतंत्र तेलंगणा विधेयक मंजूर केल्याने त्याचा मोठा फटका काँग्रेसला बसला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. किरणकुमार रेड्डी यांच्यासह सहा मंत्र्यांनी बुधवारी राजीनामे दिले. याशिवाय स्वतंत्र तेलंगणा विरोधात सीमांध्र भागात कडकडीत बंद पुकारला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आंध्रचे मुख्यमंत्री एन. किरणकुमार रेड्डी यांनी सकाळी अकरा वाजता राज्यपालांची भेट घेऊन आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्याचबरोबर काँग्रेस पक्षालाही सोडचिठ्ठीही दिली. याशिवाय, आंध्र प्रदेश मंत्रिमंडळातील कॉंग्रेसच्या सहा आमदारांनी पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच पक्षालाही 'रामराम' केला आहे.

तेलंगणा विधेयकाला मंजुरी देऊन केंद्र सरकारने आंध्र प्रदेशचे दोन तुकडे केले आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण आंध्र प्रदेशचे वातावरण तापले आहे. आंध्र प्रदेशातील सीमांध्र भागात अखंड आंध्र प्रदेश समर्थक आणि तेलुगु देसम आणि वायएसआर कॉंग्रेस पक्षासह अनेक राजकीय पक्षांनी कडकडीत बंद पुकारला आहे. बंदला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, सोनिया गांधी आणि राहुल गांधींचे पोस्टर्स जाळून निषेध...