आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नव्या नोटेतील मोदींच्या व्हिडिओचे हे आहे सिक्रेट, चिप असल्याची निव्वळ अफवा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पाचशे आणि दोन हजारांच्या नव्या नोटांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ दिसत असल्याची देशभर चर्चा आहे. भारतातील एखाद्या चलनी नोटेवर असा व्हिडिओ दिसण्याची कदाचित ही पहिलीच वेळ आहे. ज्या नोटेवर हा व्हिडिओ प्ले झाला ती नोट खरी, असाही लोकांचा समज झाला आहे. त्यासोबतच नोटेमध्ये चीप असल्याच्या अफेवलाही यामुळे बळ मिळत आहे. लोक आता मोदींच्या व्हिडिओद्वारेच नोटेच्या सत्य-असत्याची पडताळणी करतआहेत, मात्र हे सर्व खरे आहे का ? खरंच नोटेमध्ये मोदींचा व्हिडिओ फिट आहे का ?
काय आहे सत्य
- नोटवर व्हिडिओ प्ले होत असल्याची बातमी खरी आहे. यावर सहजा-सहजी विश्वास ठेवणे कठिण आहे, मात्र आजच्या टेक्नॉलॉजिच्या युगात ते असा कारनामा करणे अवघड देखिल नाही.
- हे एका अॅप द्वारे शक्य झाले आहे. मोबाइलमधून 500 - 2000 रुपयांच्या नोटेला स्कॅन केले जाते, तेव्हा पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ प्ले होते. यासाठी नोटेच्या दोन्ही बाजूंना स्कॅन करणे आवश्यक आहे.

जुन्या नोटांमध्ये चालत नाही व्हिडिओ
- मोदींचा व्हिडिओ फक्त नव्या नोटांमध्ये प्ले होतो. जुन्या 500, 1000 आणि 100 रुपयांच्या नोटांमध्ये तो प्ले होत नाही.
- त्यामुळे लोकांची अशी भावना झाली आहे की नव्या नोटांची सत्यता पडताळण्यासाठी मोदींचा व्हिडिओ प्ले झाला पाहिजे.
पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, मोदी व्हिडिओचे गुपित...
बातम्या आणखी आहेत...