आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्रीकरांच्या वक्तव्यावरून राज्यसभेत गदारोळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी चित्रपट अभिनेता आमिर खानबाबत केलेल्या वक्तव्यावरून सोमवारी संसदेत काही काळ गदारोळ झाला. पर्रीकर हे देशाचे संरक्षणमंत्री आहेत. त्यांनी अल्पसंख्याकांमध्ये भीती पसरवू नये, असे विरोधकांनी सुनावले. पण आपण तसे वक्तव्य केलेच नाही, असे सप्ष्टीकरण पर्रीकर यांनी दिले.

तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओ ब्रायन यांनी शून्य शहरात देशात धार्मिक मूलतत्त्ववादात धोकादायक वाढ होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, केंद्र सरकारचे मंत्री आणि सत्ताधारी पक्षाशी संबंधित पदाधिकारी दररोज प्रक्षोभक वक्तव्ये करत आहेत. आता पंतप्रधानांनीच या प्रकरणी सभागृहात येऊन हे सरकारचे धोरण नाही असे स्पष्टीकरण देण्याची गरज आहे. पंतप्रधानांनी सभागृहात यावे आणि आम्हीही भारतात राहू शकतो याचे आश्वासन द्यावे.

डेरेक यांचे वक्तव्य संपताच राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी एका वृत्ताचा संदर्भ दिला. ‘पर्रीकर यांचे अभिनेत्याला खडे बोल, जे असे बोलतात त्यांना धडा शिकवायला हवा,’ असे या वृत्तात म्हटले होते. त्याचा उल्लेख करून आझाद म्हणाले की, पर्रीकर अल्पसंख्याकांना कोणता धडा शिकवणार आहेत, त्यांच्याविरोधात कोणती कारवाई करणार आहेत हे त्यांनी सांगावे. माकपचे सीताराम येचुरी म्हणाले की, पर्रीकरांचे वक्तव्य आक्षेपार्ह आहे. यावरून हक्कभंगही मांडता येऊ शकतो. उपसभापती पी. जे. कुरियन यांनी सदस्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ पाहा असे मंत्री म्हणत आहेत, म्हणजे त्यांनी तसे वक्तव्य केले नसावे, अशी टिप्पणी कुरियन यांनी केली.

व्हिडिओ पाहूनच बोला
उत्तर देताना पर्रीकर म्हणाले की, मी फक्त एकच गोष्ट सांगतो. सदस्यांनी संबंधित व्हिडिओ पाहावा आणि नंतर मतप्रदर्शन करावे. मात्र त्यामुळे संतप्त सदस्यांचे समाधान झाले नाही.
बातम्या आणखी आहेत...