आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...यामुळे नाकारला अनिल अंबानींनी Rcom चा वर्षभराचा पगार, बोर्डानेही नाकारले 21 दिवसांचे वेतन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रिलायंस समूहाचे चेअरमन अनिल अंबानी यांनी आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये Rcom कडून वेतन घेणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीच्या संचालक आणि व्यवस्थापन मंडळाने सुद्धा 21 दिवसांचे वेतन घेणार नाही असे ठरवले आहे. नुकतेच आलेल्या वृत्तानुसार, Rcom ला गेल्या आर्थिक त्रैमासिकात रिलायंस कम्युनिकेशन्सला आतापर्यंतचे सर्वात मोठे नुकसान झाले. यासोबतच कंपनीवर असलेले कर्ज लक्षात घेता खर्च कपातीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. 
 
Rcom वर तब्बल 45 हजार कोटींचे कर्ज
- रिलायंस कम्युनिकेशन्स सध्या मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जात आहे. कंपनीवर सद्यस्थितीला तब्बल 45 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. 
- याच कर्जाचा आणि नुकसानीचा आढावा घेण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाची आणि चेअरम अनिल अंबानी यांची बैठक सुद्धा झाली. यासोबतच, कर्ज देणाऱ्यांनी रिलायंस कम्युनिकेशन्सला परतफेड करण्यासाठी 7 महिन्यांची मुदत दिली आहे. 
 
 
डिसेंबर पर्यंत 60 टक्के परतफेडीचे लक्ष्य
- कंपनीने डिसेंबरपर्यंत आपल्यावरील 60 टक्के कर्ज परतफेड करणार अशी योजना आखली आहे. डिसेंबरपर्यंत 45 हजार कोटींपैकी 25 हजार कोटी रुपये फेडले जातील अशी अपेक्षा बोर्डाने व्यक्त केली आहे. 
- कंपनीची काही संपत्ती विकण्यासाठी ब्रुकफील्डशी करार झाला आहे. यातून कर्ज फेडण्यात मोठी मदत होऊ शकते. यासोबतच, आरकॉम एयरसेल सोबत विलीनिकरणाच्या प्रक्रियेतून सुद्धा जात आहे. 
- मर्जरनंतर नव्या कंपनीचे नाव एयरकॉम असे असे अनिल अंबानी यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. 
बातम्या आणखी आहेत...