आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anil Shastri Demand To Open Lalabahaddur Shastri's Related Files

शास्त्रीजींशी संबंधित फायली खुल्या करा, अनिल शास्त्री यांची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित काही फायली खुल्या झाल्यानंतर आता माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या मृत्यूशी संबंधित कागदपत्रे जारी करण्याची मागणी पुढे आली आहे. शास्त्रीजींचा मृत्यू अनैसर्गिक आहे, अशी टिप्पणी त्यांचे चिरंजीव तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल शास्त्री यांनी करत पंतप्रधान मोदींनी ही कागदपत्रे जाहीर करावी, अशी मागणी केली.
शास्त्र म्हणाले, दिल्लीत पालम विमानतळावर मी वडिलांचे पार्थिव पाहिले तेव्हा ते निळे पडलेले होते. चेहऱ्यावर पांढरे व्रण होते. शास्त्रीजींचा मृत्यू १९६६ मध्ये तेव्हाच्या सोव्हिएत संघातील ताश्कंदमध्ये झाला. १९६५ भारत-पाक युद्धानंतर पाकच्या नेत्यांशी समझोता करण्यासाठी ते तेथे गेले होते.