आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी बनली जिद्दी अंजुम दुसरी महिला "आयपीएस'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिमला - काही तरी वेगळे करून देण्याची जिद्द असेल तर तो माणूस इतरांसाठी आदर्श निर्माण करू शकतो. देशातील दुसरी मुस्लिम आयपीएस महिला अंजुम आराचे हे मत आहे. एकीकडे मुस्लिम समाजात मुलींना बुरखा घालूनच वावरणे बंधनकारक केले जात असताना जुन्या रुढी-परंपरा ओलांडून देशातील दुसरी महिला आयपीएस होण्याचा मान अंजुमने मिळवला आहे.

यापूर्वी मुंबईची सारा रिकावी हिने देशातील पहिली मुस्लिम आयपीएस होण्याचा मान पटकावला होता. अंजुमने नोकरी करण्याची इच्छा बोलून दाखवली तेव्हा नातेवाईक तसेच इतर आप्तेष्टांनी तिला विरोध केला होता. तिने घराबाहेर पडणेच या नातेवाईकांना आवडत नव्हते. कुटुंबातही बुरखा प्रथेलाच महत्त्व दिले जात असे. मात्र असा विरोध होत असतानाही वडिलांनीच आपल्याला प्रेरणा दिल्याचे अंजुम सांगते. प्रचंड कष्ट आणि जिद्दीने प्रयत्न केल्यानंतर २०११ मध्ये आयपीएससाठी तिची निवड झाली. आज अंजुम सिमल्यामध्ये एएसपी पदावर आहे. आपल्या यशाचे श्रेय ती वडिलांनाच देते.

मणिपूरमध्ये पहिली नियुक्ती
प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर अंजुमला सर्वप्रथम मणिपूरमध्ये नियुक्ती मिळाली. काही महिन्यांनंतर तिला हिमाचल प्रदेशची राजधानी सिमलामध्ये एएसपी म्हणून नियुक्ती देण्यात आली. सध्या ती पती व मुलांसह येथेच राहते. जुन्या रुढी-परंपरा सोडून पालकांनी मुलींना विविध क्षेत्रात पुढे येण्यासाठी सतत प्रेरणा द्यावी, असे तिला वाटते.

पती आयएएस अधिकारी
पती युनूस पण आयएएस असून सिमल्यामध्ये अतिरिक्त उपायुक्त (एडीसी) म्हणून ते कार्यरत आहेत. सोलनमधील नालागडमध्ये काही खाणमाफियांनी त्यांना ट्रॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न केला होता.

बी. टेक. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
अंजुमचा जन्म आजमगडमधील कम्हरिया या एका छोट्या गावात झाला. वडील अयुब शेख शासकीय सेवेत होते. तिने सहारनपूरमध्ये उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. बारावी परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यानंतर अभियांत्रिकी महाविद्यालयात बी. टेक. प्रथम श्रेणीतच उत्तीर्ण झाली. यानंतर आयपीएस होण्याचे ध्येय ठेवले आणि ते गाठलेही.
बातम्या आणखी आहेत...