आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ankit Fadia Appointed As Digital India Brand Ambassador

हॅकर अंकित फाडियाला मोदी सरकारने केले 'डिजिटल इंडिया'चे ब्रँड अॅम्बेसेडर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - हॅकर म्हणूक प्रसिद्ध असलेला अंकित फाडिया याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प डिजिटल इंडियाचा ब्रँड अॅम्बेसेडर नियुक्त केले आहे. अंकितने सोमवारी फेसबुक पोस्टद्वारे याची माहिती दिली आहे. त्याने लिहिले आहे, 'पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिजिटल इंडिया प्रकल्पाचा ब्रँड अॅम्बेसेडर नियुक्त झाल्यानंतर अभिमान वाटत आहे.'
काय आहे पोस्टवर
अंकित फाडिया 30 वर्षांचा आहे. त्याने त्याच्या फेसबुक वॉलवर त्याला डिजिटल इंडियाचा ब्रँड अॅम्बेसेडर केले असल्याची घोषणा केली आहे. त्यासोबत एक पत्र आणि काही फोटो पोस्ट केले आहेत. त्याने डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड आयटी कडून मिळालेले प्रमाणपत्र देखली अपलोड केले आहे. त्याने पोस्ट केलेल्या प्रमाणपत्रानूसार त्याला एक वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर नियुक्त करण्यात आले आहे.
कोण आहे अंकित फाडिया
अंकित फाडिया स्वतःला एथिकल हॅकर असल्याचे सांगतो. हॅकिंगशिवाय अंकितने तंत्रज्ञानासंबंधी पुस्तके लिहिली आहेत. 2008 मध्ये त्याने एम टीव्ही वाहिणीवर एक शो केला होता, त्याचे नाव होते What The Hack. या शोमध्ये अंकित इंटरनेट हॅकिंगचा चांगला उपयोग कसा करता येईल आणि त्याच्या टिप्स देत होतो. तांत्रिक प्रश्नांची उत्तरे देखील तो या शोद्वारे देत होता.