आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Exclusive: अस्वतंत्र विचारांच्या सन्मानाला वेळ लागेल; पण तो मिळेल- अण्णा हजारे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ‘स्वतंत्र विचारा’ चे महत्त्व सांगत त्या अनुषंगाने काही अपेक्षाही व्यक्त केल्या आहेत. त्यांना माध्यमांकडून असलेल्या अपेक्षा आणि सर्वसामान्यांकडून असलेल्या अपेक्षा काय आहेत, हे जाणून घेऊया त्यांच्याच शब्दांत...
नवी दिल्ली- रामलीला मैदानावर झालेल्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनामुळे जगविख्यात झालेल्या अण्णा हजारेंशी सुमारे दोन तास मनमोकळ्या गप्पा झाल्या. त्या काळात अण्णांच्या आयुष्यातले किती तरी टप्पे त्यांनी जिवंत केले. नरेंद्र मोदींपासून आपल्याच जुन्या सहकाऱ्यांपर्यंत आणि ‘अण्णा’ या त्यांच्या जीवनावरील चित्रपटापर्यंतच्या सर्व प्रश्नांना त्यांनी मोकळेपणे उत्तरे दिली. याच गप्पांचा काही अंश इथे देत आहोत.

प्रश्न : ‘स्वतंत्र विचार’ या संकल्पनेकडे तुम्ही कसे पाहता?
उत्तर: लाेकशाहीचा अर्थच असा अाहे की ती लाेकांची अाहे. सुदृढ लाेकशाही निर्माण
करायची असेल तर प्रत्येक नागरिकाच्या स्वत:च्या विचारांना स्थान असले पाहिजे. २६ जानेवारी १९५० राेजी प्रजासत्ताक अाल्याने या देशाचा ताे मालक झाला अाहे. मंत्री, अामदार, खासदार, अधिकारी हे सगळे सेवक अाहेत. एखाद्या व्यक्तीस अापण बिनडाेक म्हणत असलाे तरी ताे या देशाचा मालक असल्याने त्याला स्वत:च्या विचाराचे स्वातंत्र्य हे असायलाच पाहिजे. काही माणसे सामान्य असली तरी त्यांचे विचार
असामान्य असतात.
यात माध्यमांच्या भूमिकेबद्दल काय सांगाल?
Áस्वतंत्र विचाराबाबत वृत्तपत्रांची भूमिका महत्त्वाची अाहे. पत्रकाराचा एक लेख अाला तर सरकार हलते. परंतु काही पत्रकारांच्या लेखणीची धार कमी झाली अाहे. त्याचे कारण अाहे, ज्या पत्रकाराच्या लेखणीतून अक्षरे उमटणार अाहेत त्याचे चारित्र्य, अाचार, विचार शुद्ध असायला पाहिजेत.
अण्णांनी ‘नो निगेटिव्ह’ अभियानाचे केले कौतुक
दैनिक दिव्य मराठीच्या ‘जगा नो निगेटिव्ह’ अभियानाचे अण्णांनी कौतुक केले. ते म्हणाले की, हा एक अभिनव उपक्रम आहे. सतत हिंसा आणि गुन्हेगारीच्या बातम्या वाचून सर्वसामान्यांची मनेही नकारात्मकतेने भरून जातात. त्यामुळे आठवड्याचा प्रारंभ सकारात्मक करणे चांगले.
पुढील स्लाइडमध्ये, वाचा निवडणुका समूहाने नव्हे, व्यक्तीने लढवाव्यात
बातम्या आणखी आहेत...