आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ममता बॅनर्जींच्या सभेला गर्दी नव्हती म्हणून गेलो नाही; अण्णा हजारेंचे स्पष्टीकरण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत आयोजित केलेल्या जाहीर सभेला दोन-अडीच हजार लोकच होते. त्यामुळेच मी सभेला गेलो नाही, असे स्पष्टीकरण अण्णा हजारे यांनी दिले. शिवाय यानंतर कोणत्याच पक्षाला सर्मथन देण्याच्या भानगडीत न पडता फक्त जनजागृतीचेच कार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सभेचे आयोजन करणारे ज्येष्ठ पत्रकार आणि माजी खासदार संतोष भारती हेच ममता व आपल्यामधील झारीतले शुक्राचार्य आहेत अशी प्रखर टीका अण्णांनी केली.