आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anna Hazare Mamta Banerjee Aap Arvind Kejriwal Latest News

पंतप्रधान कोण होईल ते निवडणुकीपूर्वी नव्हे नंतर ठरेल- ममतांचा मोदींना अप्रत्यक्ष टोला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- जनलोकपाल विधेयकासाठी जीवाची बाजी लावणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे कौतुक करीत आगामी लोकसभा निवडणुकीत दीदींच्या पक्षाचा प्रचार करणार असल्याचे म्हटले आहे. अण्णा आणि ममता बॅनर्जी यांनी आज (बुधवारी) दुपारी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. ममतादीदींचे विचार देश व समाजाच्या हिताचे वाटत असल्याने मी त्यांना समर्थन देत आहे. त्यामुळेच ममता बॅनर्जी या पंतप्रधानपदासाठी सर्वांत योग्य उमेदवार असल्याचे मला वाटते. अण्णा हजारे प्रथमच एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्यांसमवेत व्यासपीठावर आले आहेत.
अण्णा म्हणाले, की मी देशातील सर्व राजकीय पक्षांना एक पत्र लिहून देशातील व्यवस्था परिवर्तनाबाबत माझे म्हणणे मांडले होते. त्यात 17 मुद्यांचा समावेश होता. देशातील कोणत्याही पक्षाने मला प्रतिसाद दिला नाही. पण ममता यांच्या तृणमूल पक्षाला आमचे मुद्दे पटले. ममता यांनी आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. आज देशातील कोणत्या मुख्यमंत्र्यांचे आंदोलन करताना हात-पाय तुटले आहेत ते मला सांगावे. ममता अतिशय साध्या पद्धतीने राहतात. त्याच्या साधेपणात सच्चेपणा दिसून येतो, त्या कोणताही बनाव करीत नाहीत.
देशात व्यवस्था परिवर्तन होण्याची गरज असल्याचे सांगून अण्णा म्हणाले, की आज देशातील सर्व पक्ष सत्ता परिवर्तनाच्या बाता करतात. कोणीही व्यवस्था परिवर्तनाबाबत बोलत नाही. मी नरेंद्र मोदी असो की केजरीवाल असो त्यांना पाठिंबा देणार नाही. मात्र जो आमचे मुद्दे मान्य करीत व व्यवस्था परिवर्तनासाठी काम करेल त्या सर्वांना माझा पाठिंबा राहिल. 2019 च्या सार्वत्रिक लोकसभेपर्यंत देशात 100 असे नेते, खासदार तयार करण्याचे नियोजन आहे.
ममता यांनी नरेंद्र मोदींना अप्रत्यक्ष टोला मारताना म्हटले, की देशाचा पंतप्रधान कोण होणार हे निवडणुकीच्या निकालानंतर ठरेल. ते आधीच ठरवता येत नाही. आम्ही अण्णांच्या सर्व मुद्यांचे समर्थन करतो व अण्णांच्या विचारांनी मार्गक्रमण करू.
अण्णा आणि ममता बॅनर्जी यांच्यात होता 36 चा आकडा, वाचा पुढे...