आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anna Hazare Praises Narendra Modi, Criticizes Arvind Kejriwal

अण्णा हजारेंकडून मोदी सरकारची प्रशंसा; म्हटले...\'अच्‍छे दिन आने वाले हैं\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनींनी केंद्रात स्थापन झालेल्या नरेंद्र मोदी सरकारची प्रशंसा केली. 'अच्‍छे दिन आने वाले हैं असेही अण्णांनी म्हटले आहे. याशिवाय अण्णांनी 'आप'चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली.

एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना अण्णा हजारे म्हणाले, नरेंद्र मोदी सरकारने अल्पावधीत जनतेचा विश्वास संपादन केला आहे. मोदींनी जनतेसमोर सकारात्मक प्रतिभा उभी केली आहे. त्यामुळे जनतेला चांगले दिवस येणार असल्याची शक्यताही नाकारता येत नाही.

दुसरीकडे, नुकतेच स्थापन करण्‍यात आलेल्या 'असली आझादी अभियान'च्या माध्यमातून 4 ते 6 महिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळावर बारीक लक्ष ठेवले जाणार असल्याचे अण्णा हजारेंनी सांगितले. नवे सरकारने जनतेला दिलेले वचन पूर्ण केले नाही तर देशव्यापी आंदोलन छेडले जाईल असा इशाराही दिला आहे.
यूपीए सरकारच्या चुकांपासून धडा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्र्यांना निर्देश जारी केले आहे. यात म्हटले आहे की, कोणताही मंत्री आपल्या नातेवाईकांना मंत्रालयात खासगी स्टाफमध्ये ठेवणार नाही, नातेवाईकांना सरकारी कामांचे कंत्राटही मिळवून देणार नाही. बंगले, कार्यालयांच्या सजावटीवर फाजील खर्च न करण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. या मोदींच्या निर्णयाचे अण्णांनी स्वागत केले आहे.
नरेंद्र मोदींकडे एक वेगळी दृष्टी आहे. संपूर्ण बहुमत असलेले मोदी सरकार 'खिचडी' सरकाराच्या तुलनेत देशाच्या विकासावर भर देणार असल्याचे सध्या तरी चित्र दिसत आहे. मोदींची प्रतिभा आणि बोलण्याची शैलीवर भाजपला विजय मिळाल्याचे अण्णांनी सांगितले आहे.

पुढे वाचा, अरविंद केजरीवाल यांच्याबाबत काय म्हणाले अण्णा हजारे...