आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anna Hazare Says Only Mamataca Banerjee Serious, Latest News

भ्रष्टाचारावर फक्त ममताच गंभीर; अण्णांकडून पाठिंबा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला पाठिंबा देण्याची घोषणा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे. आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल आणि भाजपचे नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्यास त्यांनी नकार दिला. ममता याच पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार असल्याचे अण्णांनी मंगळवारच्या भेटीनंतर म्हटले होते.भ्रष्टाचाराविरोधात त्या एकमेव गंभीर मुख्यमंत्री आहेत. त्या अत्यंत साधेपणाने राहतात. तथापि, कोणत्याही पक्षात न जाण्यावर ठाम असल्याचेही अण्णांनी स्पष्ट केले.
अण्णांनी सर्वच पक्षांना 17 मुद्द्यांचे पत्र पाठवले होते. त्यास फक्त ममतांनीच उत्तर दिले होते. यातील दोन-तीन वगळता इतर मुद्दे लागू केल्याचे ममतांनी म्हटले आहे. भूसंपादनासह इतर मुद्द्यांवर अण्णांशी चर्चा करून मार्ग काढला जाईल, असे ममतांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
महिलांचा विरोध, अण्णांना पत्र
ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून देशातील विविध संघटनांनी अण्णा हजारे यांना पत्र पाठवले आहे. एकेकाळी कोलकाता हे महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर समजले जात होते. मात्र, ममतांच्या कार्यकाळात असुरक्षित बनले आहे, असे या पत्रात म्हटले आहे.