नवी दिल्ली - समाजसेवक अण्णा हजारे ग्रेट इंडिया मुव्हमेंट किंवा महान भारत अभियानात सहभागी होणार आहेत. 9 ऑगस्ट रोजी भारत छोडो आंदोलनाच्या समृतीदिनी दिल्लीमध्ये या अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे. या अभियानामध्ये अण्णांच्या बरोबर आध्यात्मिक गुरु श्रीश्री रविशंकर आणि योग गुरु रामदेव बाबा हेही सहभागी होणार आहेत. राजकारणापासून दूर राहून सामाजिक परिवर्तन घडवण्याच्या हेतूने हे अभियान सुरू करण्यात येत आहे. या अभियानाचती सुरुवात आम आदमी पार्टीचे माजी नेते आणि
केजरीवालांचे विरोधक अश्विनी उपाध्याय यांनी केली आहे.
कोर कमेटी
इस अभियानाच्या कोर कमेटीमध्ये प्राध्यापक जगमोहन राजपूत (एनसीईआरटी चे माजी संचालक), जस्टिस डीएस तेवतिया (कोलकाता हायकोर्टाचे माजी मुख्य न्यायाधीश), आयपीएस प्रकाश सिंह (उत्तर प्रदेश चे माजी महासंचालक), आयपीएस शशिकांत (पंजाबचे माजी महासंचालक), प्रभात चतुर्वेदी (माजी सचिव), डॉ.वेदप्रताप वैदिक, सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ सीनियर वकील राम जेठमलानी, पर्यावरणतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांचा समावेश आहे.
केजरीवाल, काँग्रेससाठी ठरू शकतात डोकेदुखी
श्रीश्री रविशंकर यांनी अमेरिकेतील एका कार्यक्रमात मोदी हे स्वभावाने कडक पण हळव्या मनाचे व्यक्ती असल्याचे म्हटले आहे. रविशंकर हे मोदींचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. वॉशिंगटनमध्ये आयोजित एका कार्यक्रमात रवीशंकर यांना मोदींबाबत बोलण्यास सांगण्यात आले होते. त्यावेळी रवीशंकर म्हणाले, 'मोदी हे अत्यंत कडक व्यक्ती आहेत, हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र ते तेवढेच हळवेही आहेत, हे फारच कमी लोकांना ठाऊक आहे.' रवीशंकर यांच्या प्रमाणेच रामदेव बाबाही मोदींचे अत्यंत नीकटवर्तीय असल्याचे मानले जाते. त्यांनी तर मोदी पंतप्रधान व्हावे यासाठी अभियान राबवले होते. तर अण्णा हजारे यांनीही नुकतीच पंतप्रधान म्हणून मोदींच्या कामाचे कौतुक केले होते. इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या एका मुलाखतीत अण्णा खरंच चांगले दिवस येतील असे वाटत असल्याचे म्हटले होते. त्यामुळे या तिकडीशी मोदींशी असलेली जवळीक काँग्रेस आणि केजरीवाल यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते.
फाईल फोटो - अण्णा आणि रामदेव बाबा
पुढे वाचा - काँग्रेस आणि केजरीवाल यांनी भीती कशाची?