आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Annual Pilgrimage To The Amarnath Cave Shrine Start With First 1160 Devotee

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'बोल बम' च्या घोषात अमरनाथ यात्रा सुरू, पहिल्या जत्थ्यात 1160 भाविकांना दर्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - 'हर हर महादेव', 'बोल बम', 'जय बाबा अमरनाथ' च्या जयघोषात अमरनाथ यात्रेचा पहिला जत्था शनिवारी रवाना झाला. जम्मूच्या भगवती नगरमधल्या बेस कॅम्पमधून रवाना झालेल्या या जत्थ्यात 1160 यात्रेकरूंचा समावेश आहे. जम्मूचे पर्यटन मंत्री गुलाम अहमीद मीर यांनी या जत्थ्याला हिरवी झेंडी दाखवली.
यात्रेसाठी पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. 1160 भावीकांमध्ये 957 पुरूष, 187 महिला आणि 16 मुले आहेत. त्यांना 23 बस आणि 19 छोट्या वाहनांमधून कश्मीरला रवाना करण्यात आले आहे. कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये बालटाल येथे पोहोचले. शनिवारी हा जत्था अमरनाथ गुहेकडे रवाना होईल. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमरनाथ श्राइन बोर्ड 30 जूनला पहलगाम गुहेतून जाणार्‍या रस्त्याचा आढावा घेणार आहे. जोपर्यंत अमरनाथच्या रस्त्यावरील बर्फ साफ होत नाही तोपर्यंत बालटालच्या रस्त्याने प्रवास करावा अशा सूचना भावीकांना देण्यात आल्या आहेत.
फाइल फोटो - बाबा अमरनाथ
पुढे वाचा कशी आहे अमरनाथ यात्रा..