आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Another Advertise Attacking To AAP Published By BJP

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केजरीवालांचे गोत्र उपद्रवी, भाजपची आणखी एक वादग्रस्त जाहिरात; AAP चे अल्‍टीमेटम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - सोमवारी भाजपने प्रसिद्ध केलेली जाहिरात.
नवी दिल्ली - दिल्लीमध्ये निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये भाजपने पुन्हा एकदा जाहिरातीच्या माध्यमातून 'आप'चे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला चढवला आहे. वृत्तपत्रांमध्ये सोमवारी भाजपतर्फे देण्यात आलेल्या जाहिरातींमध्ये नाव न घेता केजरीवाल यांच्यावर उपद्रवी अशी टीका केली आहे. त्यात प्रजासत्ताक दिन सोहळ्यात पास मागण्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे.

एका जाहिरातीमध्ये त्यांच्या गोत्राचा उल्लेखही करण्यात आला आहे. या प्रकारासाठी भाजपला संपूर्ण अग्रवाल समाजाची माफी मागावी लागेल असे केजरीवाल म्हणाले आहेत. केजरीवाल हे अग्रवाल समाजाचे आहेत. 'आप' प्रवक्‍ते आशुतोष यांनी सोमवारी सकाळी ट्वीटद्वारे असे म्हटले आहे की, जर दोन तासांत भाजपने जाहिरात मागे घेऊन माफी मागितली नाही तर पक्ष त्यांच्याविरोधात कारवाई करेल. निवडणूक आयोगाकडे यासंबंधी तक्रार करणार असल्याचेही ते म्हणाले.

काय आहे नव्या जाहिरातीत...
या जाहिरातीत टोपी आणि मफलर परिधान केलेली एक व्यक्ती राजपथावर परेडच्या मध्ये उभी असलेली दाखवण्यात आली आहे. त्या व्यक्तीच्या हातात झाडूही दाखवण्यात आला आहे. विशेष म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यातील प्रमुख पाहुणे बराक ओबामा आणि पंतप्रधान मोदीही जाहिरातीत दाखवण्यात आले आहेत. जाहिरातीत असेले लिहिले आहे की, 'मेरी ना सुनी तो 26 जनवरी का प्रोग्राम भी बिगाड़ जाऊंगा...और एक साल बाद वीआईपी पास की गुहार भी लगाऊंगा.'
केजरीवाल यांनी गेल्या वर्षी प्रजासत्ताक दिन सोहळ्यात विघ्न आणण्याचे वक्तव्य केले होते. सोहळ्यात धरणे आंदोलन करणार असल्याचे ते म्हणाले होते. यावेळी त्यांना सोहळ्याचे आमंत्रण मिळाले नाही तर राजकारणामुळे तसे झाल्याचे ते म्हणाले होते. त्याचाच या जाहिरातीत वापर करण्यात आला आहे.
गोत्र शब्दाला आपचा आक्षेप
पोस्टरमध्ये केजरीवाल उपद्रवी गोत्राचे असल्याचे म्हटले आहे. त्यावरून आपचा पारा चढलेला हे. ‘आप’ प्रवक्ते आशुतोष यांनी भाजपवर टीका करत असे म्हटले आहे की, केजरीवाल अग्रवाल समुदायाचे आहेत. त्यामुळे ही जाहिरात म्हणजे थेट त्यांच्या गोत्रावर हल्ला असल्याचे आपने म्हटले आहे. भाजप राजकारणाची पातळी सोडत असल्याचेही आपने म्हटले आहे. जाहिरातीत भाजपने असे लिहिले आहे.. ‘हे आंदोलनकारी..देश के करोड़ों लोग गणतंत्र दिवस को राष्ट्रीय पर्व मानते हैं। इस पर गर्व करते हैं और आपका उपद्रवी गोत्र इसमें भी व्यवधान डालने को तैयार था।’ तसेच ‘अरे भाई तय कर लो एक बार..आम आदमी हो या वीआईपी.? या आम आदमी के वेश में खास आदमी?’ असेही म्हटले आहे.
‘आप’ नेते योगेंद्र यादव यांनी या जाहिरातीवर प्रतिक्रिया दिली आहे. भाजपच्या अशा प्रकारच्या खालच्या पातळीच्या कृत्याचे काहीही प्रत्युत्तर असू शकत नाही. आप अशा प्रकारांना प्रत्युत्तर देत नाही. दिल्लीची जनताच त्याचे उत्तर देईल असे यादव म्हणाले आहेत.
पुढे पाहा, भाजपने याआधी प्रकाशित केलेल्या इतर जाहिराती...