आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप खासदार म्हणाले, रोज एक बाटली दारू आणि 60 सिगरेट ओढून लोक जिवंत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाच्या आणखी एका खासदार महोदयांनी धुम्रपानाची बाजू घेतली आहे. आसाम मधून भाजप खासदार असलेले रामप्रसाद सरमाह म्हणाले, स्मोकिंगमुळे कँसर होतो किंवा नाही हा वादाचा विषय होऊ शकतो. पण माझ्या माहितीतील दोन असे वृद्ध आहेत जे रोज एक बाटली दारू आमि 60 सिगरेट ओढतात. यातील एक अजूनही जिवंत आहे आणि दुसर्‍याचे निधन 86 व्या वर्षी झाले. सरमाह पुढे म्हणाले, की धुम्रपानाचा परिणाम कमी करण्यासाठी आयुर्वेदिक औषधींचा उपयोग होऊ शकतो का यावरही संशोधन झाले पाहिजे.
भाजपला अडचणीत आणणारी विधाने
सरमाह हे देखील तंबाखूमुळे होणाऱ्या दुष्परिणांचा अभ्यास करणाऱ्या संसदीय समितीचे सदस्य आहेत. ज्या तीन खासदारांनी तंबाखू आणि धुम्रपाणाची बाजू घेतली आहे ते सर्व भाजपचे सदस्य आहेत. या समितीचे अध्यक्ष दिलीप गांधी यांनी 31 मार्च रोजी म्हटले होते, की तंबाखूमुळे कर्करोग होतो याला पुष्टी देणारा कोणताही अभ्यास भारतात झालेला नाही.
गांधी यांच्यानंतर खासदार श्यामचरण गुप्ता यांनी देखील अशाच आशयाचे विधान केले होते. या तीन खासदारांनी तंबाखू कंपन्यांना मोठा दिलासा देणारी शिफारस केली होती.
केंद्राने तंबाखूजन्य उत्पादनांच्या पाकिटावर मोठ्या अक्षरांत चित्रमय स्वरूपात दुष्परिणामांबाबत माहिती देण्याबाबत सूचित केले होते. आधीच्या 40% जागेऐवजी आता ते प्रमाण 85 टक्के करण्यात आले आहे. ते रोखा अशी शिफारस गांधी समितीने केली होती.