आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Another Intern Alleges Sexual Harassment By Supreme Court Judge Being Probed

सुप्रिम कोर्टाचे माजी न्यायाधीश गोत्यात, आणखी एका महिलेचा लैंगिक छळाचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप त्यांच्याकडे इंटर्न असलेल्या एका मुलीने ब्लॉगवर केला होता. आता याच न्यायाधीशांकडे नोकरीला असलेल्या एका महिलेने फेसबुकवर लैंगिक छळाचा आरोप केला आहे.
लिगली इंडिया या वेबसाईटने सांगितले आहे, की आणखी एका महिलेने संबंधित न्यायाधीशांवर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. तिने यासंदर्भात फेसबुकवर पोस्ट टाकली आहे. या न्यायाधीशांनी अनेकवेळा माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्याचे प्रयत्न केले. मीसुद्धा या न्यायाधीशांच्या लैंगिक छळाचा बळी ठरली आहे. परंतु, मी धैर्याने त्यांचा प्रत्येक हल्ला यशस्वीपणे परतावून लावला, असे या महिलेने सांगितले आहे.
लिगली इंडियाने या महिलेची ओळख अद्याप उघड केलेली नाही.
सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप एका इंटर्न तरुणीने लावल्यावर मोठी खळबळ उडाली होती. या आरोपांची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी तीन सदस्यिय समिती स्थापन करून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
आणखी तीन महिलांनी केलाय हाच आरोप, वाचा पुढील स्लाईडवर