आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत पुन्हा गँगरेप: \'माझ्यावर बलात्कार झालाय\'; पीडितेने लिहिला रस्त्यावर संदेश!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशाची राजधानी दिल्लीत महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसागणिक वाढत आहेत. दिल्लीत आणखी एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. नानकपुरा गुरूद्वाराजवळी ओवर ब्रिजवर एक तरुणी अर्धनग्न अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी सकाळी साडे सात वाजता हा प्रकार उघडकीस आला.

'माझ्यावर बलात्कार झाला आहे.' असा संदेश पीड़ित तरुणीने विटेच्या तुकट्याने रस्त्यावर लिहून ठेवला होता. या प्रकरणाची पोलिसांनी दखल घेतली असून शहरातील मुख्य चौकात नाकाबंदी करण्यात आली आहे.

पीडित तरुणीने पोलिसांना सांगितले की, तिच्यावर तीन नराधमानी सामूहिक बलात्कार केला आहे. बुधवारी रात्री तिचे अपहरण करण्‍यात आले होते. बलात्कार करण्‍यापूर्वी नराधमांनी तिला गुंगीचे औषध दिले होते. बलात्कार केल्यानंतर त्यांनी तिला रस्त्यावर फेकून दिल्याचे तिने सांगितले. पीडित मुलगीही नेपाळमधील असून येथील कोटला मुबारकपूर भागात भाड्याच्या घरात राहते.

पीडित तरुणीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून अहवाल अद्याप आलेला नाही. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे एका पोलिस अधिकार्‍याने सांगितले आहे.