आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हंदवाडा: 3 दहशतवाद्यांना कंठस्नान, मनोहर पर्रिकर म्हणाले- देशासाठी \'टेढा\'ही होऊ शकतो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - पीओकेमधील सर्जिक स्ट्राइकनंतर काश्मिरमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. यावेळी दहशतवाद्यांनी हंदवाडाच्या लंगेट 30 राष्ट्रीय रायफल्स कॅम्पला लक्ष्य केले आहे. भारताने केलेल्या फायरिंगमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले असून हे ऑपरेशन संपले आहे. दहशतवाद्यांकडून एके 47 रायफल जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच दहशतवाद्यांकडे पाकिस्तानात तयार झालेली औषधेही सापडली आहेत. दरम्यान, सर्जिकल स्ट्राईकवर आग्रा येथील एका कार्यक्रमात बोलताना संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर म्हणाले, की मी देशासाठी काहीही करु शकतो. गरज भासल्यास टेढाही होऊ शकतो. पाकिस्तानमधील भारतीय लष्कराची कारवाई शंभर टक्के यशस्वी होती.
यापूर्वी दहशतवाद्यांनी बरामुल्लाच्या राष्ट्रीय रायफल्सच्या कॅम्पवर हल्ला चढवला होता. 18 सप्टेंबरला उरीमध्ये आर्मीच्या कॅम्पवर हल्ला झाला होता. त्यात 19 जवान शहीद झाले होते. त्यानंतर 28-29 सप्टेंबरच्या रात्री पॅराकमांडोजने पीओकेमध्ये सर्जिकल स्ट्राइक केले आणि 38 दहशतवादी ठार केले होते.

फायरिंग सुरुच..
- दहशतवाद्यांनी गुरुवारी सकाळी हंदवाडाच्या 30 राष्ट्रीय रायफल्सच्या कॅम्पवर अचानक फायरिंग सुरू केली.
- दोनहीकडून सुमारे 15 मिनिटे फायरिंग चालली त्यानंतर दहशतवादी पळून गेले.
- पण थोड्याच वेळात फायरिंग पुन्हा सुरू झाली आणि अजूनही फायरिंग सुरुच आहे.
- यापूर्वी रविवारी बारामुल्लाच्या 45 राष्ट्रीय रायफल्सच्या कॅम्वरही दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.
- 90 मिनिटे चाललेल्या ऑपरेशनमध्ये जवानांनी 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. तर एक जवान शहीद झाला होता.
आर्मीने 3 ठिकाणी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला..
- आर्मीने काश्मिरमध्ये एलओसीच्या पलिकडून झालेले घुसखोरीचे 3 प्रयत्न हाणून पाडले.
- एका आर्मी अधिकाऱ्याच्या मते, आर्मीने 5-6 ऑक्टोबरच्या रात्री नौगाम सेक्टरमध्ये 2 आणि रामपूर सेक्औटरमध्रये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला.
काय म्हणाले मनोहर पर्रिकर
- सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडिओ जाहीर केला जाणार नाही. मीडियाच्या प्रतिनिधींनी जाजूस होत पाकिस्तानमधील लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. येथील लोकांची मते जाणून घेतली. त्यातूनच हा हल्ला करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. आणखी काही पुरावे जनतेला मिळण्याची गरज राहिलेली नाही.
- भारताच्या संरक्षण मंत्र्याला सरळ-साधे राहून चालत नाही. मी सरळ-साधा आहे. पण जेव्हा देशाचा विषय येतो तेव्हा मी वेगळाची विचार करु शकतो हे लक्षात ठेवा.
- कोणत्याही देशाला आपल्यासारखा सर्जिकल स्ट्राईक करता आलेला नाही. यात एकसुद्धा जवान शहीद झाला नाही. आपले जवान कोणतीही मोहिम यशस्वीपणे फत्ते करु शकतात हे यावरुन सिद्ध झाले.
- मी सहसा पाच तास झोपतो. पण जेव्हा 18 जवान शहीद झाले तेव्हा झोपू शकलो नाही. तसेच सर्जिकल स्ट्राईकच्या दिवशीही मी झोपलो नव्हतो. एवढा मी अस्वस्थ होतो.
- पाकिस्तान एखादा लहान-मोठा हल्ला करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही डोळ्यांत तेल टाकून पहारा देतोय. पाकिस्तानचा कोणताही हल्ला परतवून लावला जाईल.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS.. अखेरच्या स्लाइड्सवर पाहा फायरिंगचा VIDEO..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...