आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केंद्रातही जादूटोणाविरोधी कायद्याची चाचपणी सुरू, राज्यमंत्री रामदास अाठवले यांनी घेतली बैठक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - महाराष्ट्रात जादूटाेणाविराेधी कायदा लागू करण्यात अालेला अाहे, त्याच धर्तीवर केंद्रातही अशाच कायद्याची अंमलबजावणी करता येऊ शकते का, याची चाचपणी करण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास अाठवले यांनी महाराष्ट्रातील या कायद्याचा मसुदा तयार करणारे प्रा. श्याम मानव यांच्यासाेबत दीर्घ चर्चा केली.
महाराष्ट्र नरबळी अाणि इतर अमानुष, अनिष्ट व अघाेरी प्रथा व जादूटाेणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम, २०१३ या कायद्याची अंमलबजावणी झाल्यानंतर महाराष्ट्रात सकारात्मक बदल दिसून येत अाहेत. अाठवले यांनी असा कायदा केंद्रात करता येईल काय? हे समजून घेण्यासाठी जादूटाेणाविराेधी कायदा जनजागृती, प्रचार अाणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीचे सहअध्यक्ष प्रा. श्याम मानव यांच्याकडून माहिती घेतली.
प्रत्येक राज्यातील रूढी, परंपरा अाणि त्या अनुषंगाने अनिष्ट व अघाेरी प्रथा वेगवेगळ्या असल्याने प्रत्येक राज्याचा स्वतंत्रपणे अभ्यास करून केंद्र सरकार या कायद्याचा स्वतंत्र मसुदा तयार करू शकते, असे अाठवले यांनी सुचवले. यासाठी प्रा. मानव यांच्या मार्गदर्शनात अभ्यासगट तयार करण्यासाठी अाठवले यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या बैठकीला सामाजिक न्याय विभागाच्या सहसचिव इंद्राणी मूर्ती, अ. भा. अंनिसचे राज्य सचिव प्रशांत सपाटे, राजेश वानखेडे अाणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित हाेते.
अाठवले हे याबाबत लवकरच सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलाेत व कायदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. प्रा. मानव यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर व गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली.
बातम्या आणखी आहेत...