आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Antibiotics Medicine In Your Chicken, News In Marathi

CSE REPORT: सावधान! तुम्ही खात आहात चिकनसोबत एंटीबायोटिक!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- 'सेंटर फॉर सायन्स अँड इन्व्हायरमेंट' (सीएसई) या संस्थेने एक संशोधन केले आहे. सीएसईने काढलेल्या निष्कर्षावरून एक धक्कादायक खुलासाही केला आहे. बाजारात सध्या उपलब्ध असलेल्या बहुतांश चिकनमध्ये मोठ्या प्रमाणात एंटीबायोटिक आहे. वजन वाढीसाठी कोंबड्यांना मोठ्याप्रमाणात एंटीबायोटीक दिले जात असल्याचे आढळून आले आहे. एंटीबायोटीक मिश्रीत चिकन खाल्ल्याने बरे झालेले आजार पुन्हा डोके वर काढू शकतात, असा इशाराही सीएसईने दिला आहे. सीएसईच्या सर्व्हेचा उद्देश लोकांची दिशाभूल रोखून त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करणे आहे.

'सीएसई'ने चिकनमध्ये आढळून येत असलेल्या एंटी बायोटिक्‍सच्या अवशेषांचे परीक्षण केले आहे. धक्कादायक म्हणजे 40 टक्के नमुन्यात एंटी बायोटिक्‍सचे अवशेष आढल्याचे दावा सीएसईने केला आहे. सीएसईच्या डायरेक्‍टर जनरल सुनिता नारायण यांच्या मते, चिकन उद्योगात मोठी तेजी आली आहे. कोंबड्यांची चांगली वाढ होण्यासाठी त्यांना मोठ्याप्रमाणात एंटी बायोटिक्‍स दिले जात आहे. कोंबड्यांची झपाटयाने वाढ होऊन मोठा नफा कमावणे हा या मागील उद्देश आहे.

यामुळे चिकनमध्ये एंटी बायोटिक प्रतिरोधक बॅक्टेरियाची निर्मिती होत असते. चिकन खाल्याने हा बॅक्टेरिया आपल्या शरीरातही पोहोचतो. त्यामुळे आपले बरे झालेले आजार पुन्हा एकदा डोके वर काढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, दिल्‍लीसह एनसीआरमध्ये गोळा केले 70 नमुने...