आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Antulay Blames Congress High Command For Party's Defeat

पक्षश्रेष्ठींमुळेच काँग्रेसवर आताचे दिवस : अंतुले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या दारुण पराभवासाठी फक्त काँग्रेस पक्षश्रेष्ठीच जबाबदार आहेत, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते बॅ. ए. आर. अंतुले यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असलेले 85 वर्षीय अंतुले इंदिरा गांधी यांचे कट्टर निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. त्यांच्या 2, जनपथ या निवासस्थानीच इंदिरा गांधी यांनी 1978 मध्ये काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्तरावर काँग्रेसची 206 वरून अवघ्या 44 जागांपर्यंत घसरण झाली आहे. महाराष्ट्रात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी युती करून 15 वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसला या वेळी 48 पैकी फक्त 2 जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रीय स्तरावर तसेच महाराष्ट्रात झालेला पक्षाचा दारुण पराभव आणि सध्याच्या बिकट परिस्थितीत पक्ष कशी उभारी घेणार, या मुद्दय़ांवर वृत्तसंस्थेने अंतुले यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला ते काहीही बोलण्यास नाखुशच होते. मात्र, मनधरणीनंतर अखेर ते राजी झाले.

काय म्हणाले अंतुले?
0 लोकसभेत स्वबळावर विरोधी पक्षनेतेपदही मिळू नये एवढा दारुण पराभव पक्षाला पत्करावा लागला.
0पक्षश्रेष्ठींमुळेच आमच्यावर हा दिवस पाहण्याची वेळ आली आहे. मात्र त्याची चिंताही पक्षश्रेष्ठींना वाटत असल्याचे दिसत नाही, आता यावर आपण काय म्हणू शकतो ?
0अनेक राज्यांत पक्षाला एकही जागा मिळालेली नाही. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पक्षाचे नावापुरतेच अस्तित्व उरले आहे. अशा परिस्थितीत पक्षाचे पुनरुज्जीवन कसे करता येऊ शकेल, अशी विचारणा अजूनही कोणीही आपल्याकडे केलेली नाही.
0इंदिरा गांधी यांनी 1978 मध्ये अत्यंत कठीण परिस्थितीत काँग्रेसच्या स्थापनेनंतर पक्षाला एवढी मोठी उभारी दिली होती की अवघ्या दोन वर्षांत पुन्हा सत्तेत परत येण्यासाठी माझ्यासारख्यांनी अपार कष्ट केले.