आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS: एक ओळ लिहून संपूर्ण जगभर प्रसिद्धी आणि कमाई कोट्यवधी रुपयांत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनुजा चौहान : १९७०, मेरठ, उत्तर प्रदेश
शिक्षण : आर्मी पब्लिक स्कूल, नवी दिल्ली, सोफिया गर्ल्स कॉन्व्हेंट, मथुरा रोड, डीयूमधून इकॉनॉमिक्स, रॉयल मेलबोर्न इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून मास कम्युनिकेशन

विवाह : १९९४ मध्ये टीव्ही प्रोड्युसर- निरत अल्वा यांच्याशी

चर्चेत : त्यांनी जेडब्ल्यूटी अॅडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये क्रिएटिव्ह कन्सल्टंट म्हणून पदभार स्वीकारला आहे.
जाहिरात क्षेत्रातील अव्वल व्यक्तींमध्ये स्थान प्राप्त केलेल्या अनुजा यांनी वयाच्या २४ व्या वर्षी जेडब्ल्यूटी इंडियामध्ये नोकरी पत्करली आणि पहिल्याच वर्षी त्यांना पेप्सीची सर्वात मोठी जाहिरात मिळाली. या पार्श्वभूमीवर अनुजा चौहान म्हणाल्या, ज्या कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून नोकरी स्वीकारली त्याच कंपनीत १७ वर्षांपासून कार्यरत आहे ही बाब सुखावह आहे. नऊ वर्षांत नऊ पदोन्नती मिळाल्या. सर्वात तरुण उपाध्यक्ष झाले. लहानपणापासून लिखाणाची आवड होती. सर्जनशील लिखाणाची आवड होती, त्यामुळे कायम लिहीत राहिले. लिखाणाच्या सवयीला व्यावसायिक रूप देण्याचा विचार केला आणि २००८ मध्ये पहिल्यांदा "द झोया फॅक्टर' ही कादंबरी लिहिली. त्याला प्रतिसाद चांगला मिळाला. यानंतर २०१० मध्ये लिखाणासाठी नोकरी सोडली. या वर्षी बॅटल फॉर बिट्टोरा आणि २०१२ मध्ये दोज प्रायसी ठाकूर गर्ल्स यासारख्या बेस्टसेलर्स पुस्तकांचे लिखाण झाले. दोज प्रायसी ठाकूर गर्ल्सचे पुढचे भाग हाऊज दॅट बिझी बिल्ट पूर्ण केले असून ते याच महिन्यात बाजारात येणार आहे. त्या स्टार प्लसच्या एका कार्यक्रमासाठी लिहीत आहेत.
मुलींच्या करिअरमध्ये लेखन क्षेत्र हा चांगला पर्याय असल्याचे त्यांचे मत आहे, मात्र दोन्ही मुलींना त्यात रस नाही.
१७ वर्षांपासून पेप्सीसोबत असल्यामुळे अनुजा तो आपला ब्रँड असल्याचे सांगतात. पेप्सीच्या विनंतीवरून त्या पुन्हा या कंपनीशी जोडल्या आहेत.
या पंचलाइन्समुळे अनुजा यांना मिळाली प्रसिद्धी
नथिंग ऑफिशियल अबाउट इट

१९९४ मध्ये पेप्सीच्या या जाहिरातीच्या काही दिवस आधी अनुजा एजन्सीत रुजू झाल्या होत्या. दोन वर्षांनंतर क्रिकेट विश्वचषक होता. पेप्सीने क्रीडा क्षेत्रात जम बसवला होता. कोका कोला विश्वचषकाचा अधिकृत प्रायोजक होता, त्यामुळे पेप्सीसाठी ही जाहिरात आणखी महत्त्वपूर्ण होती. कोकचा चहुबाजूंनी गवगवा होता. त्यावर अनुजा म्हणाल्या, बॉसने संपूर्ण कर्मचाऱ्यांना कॅचफ्रेज लिहिण्यास सांगितले होते. घरी मी विचार केला, कोक ऑफिशियल पार्टनर आहे, मात्र त्यात ऑफिशियल काय आहे. त्याच वेळी तोंडातून शब्द पडले, नथिंग ऑफिशियल अबाउट इट. मी ते लिहिले आणि झोपी गेले. ही ओळ चांगली आहे की वाईट, एवढी समजही तेव्हा नव्हती. दुसऱ्या दिवशी कार्यालयात ती सर्वांना आवडली. बॉसने संहिता लिहिण्यास सांगितले. कॅचफ्रेज आणि स्क्रिप्ट कार्यालयाला पाठवली. कंपनीचा मुख्य भर तरुणांवर होता, त्यांच्यासाठी ऑफिशियल असे काहीच नव्हते. त्यामुळे कंपनीला हे घोषवाक्य आवडले. कंपनीला ही ओळ एवढी आवडली की त्यांनी त्याची जगभर प्रसिद्धी करण्याचे ठरवले तसेच कोणत्याही कार्यक्रमाचा अधिकृत प्रायोजक न होण्याचे ठरवले. गेल्या वर्षी पेप्सिको इंडियाचे अध्यक्ष मनू आनंद यांनी आयपीएलच्या सहाव्या आवृत्तीवर १६० कोटी रुपये खर्च केले होते,आणि त्याचा कंपनीला फायदाही झाला नव्हता. एवढ्या एकाच कारणावरून त्यांना बाजूला करण्यात आले होते.
डर के आगे जीत है
या जाहिरातीसोबत माउंटन ड्यूने भारतात पाऊल ठेवले. त्यांनी ड्यूच्या जाहिरातीत शांत मुलाला पर्वतावरून उडी टाकताना दाखवले. त्यांना हे सर्व करताना भीती वाटत नाही काय, असा विचार त्यांच्या मनात आला. हे किती धाडस आहे. डेयरिंगच्या शब्दात पहिली तीन अक्षरे डर आहेत, असा विचार डोक्यात आला. म्हणजे डेयरिंगच्या आधी डर आवश्यक आहे. पहिल्यांदा डर, नंतर डेयरिंग. याचा अर्थ डर के आगे जीत है। या कॅचलाइनला खूप प्रसिद्धी मिळाली.
ओए बबली!
अनुजा म्हणाल्या, कोकची ठंडा जाहिरात सुपरहिट होत होती. पेप्सीने कुणा सेलिब्रिटी किंवा स्टारवर अवलंबून न राहता केवळ उत्पादनावर प्रकाशझोत टाकला होता. सहज बोलता येऊ शकेल अशा वाक्याच्या ते शोधात होते. कॅचलाइन लिहिताना कार्यालयातील सुंदर, बबली तरुणीवर लक्ष गेले. यातूनच बबली शब्द सापडला. त्या काळात ओए बेबी गाणे लोकांच्या ओठावर होते. त्यातून ओए शब्द मिळाला आणि त्यानंतर ओए बबली कॅचलाइन दिली आणि या शब्दांनी नंतर जगभरात धूम केली.

पुढील स्लाइडमध्ये, अनुजा चौहान यांच्या आयुष्यातील आठवणीचे क्षण...