आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anupam Kher Stopped At Srinagar Airport, Blocked From Visiting NIT

अनुपम खेर यांना श्रीनगर NIT मध्‍ये जाण्‍यापासून रोखले, पोलिसांनी सांगितले कारण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/ श्रीनगर - ज्‍येष्‍ठ अभिनेते अनुपम खेर यांना श्रीनगरमधील नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्‍ये (एनआयटी) प्रवेश करण्‍यापासून रोखण्‍यात आले आहे. रविवारी ते एनआयटीच्‍या विद्यार्थ्‍यांना भेटण्‍यासाठी येथे पोहोचले होते. पोलिसांनी त्‍यांना विमानतळावरच थांबवले. त्‍यांना दिल्‍लीला परत पाठवण्‍यात येत आहे.
- रविवारी सकाळी अनुपम श्रीनगर विमानतळावर पोहोचताच पोलिसांनी त्‍यांना अडवले.
- तुम्‍ही एनआयटीमध्‍ये जाऊ नका असे पोलिसांनी अनुपम यांना सांगितले.
- विमानतळावर असलेल्‍या अँटी हाय चेकिंग पोलिसांनी त्‍यांना अडवले.
- जम्‍मू काश्‍मीर सरकार आणि पोलिसांचे मत आहे की, एनआयटीमध्‍ये तणावाचे वातावरण आहे. अनुपम तेथे गेल्‍यावर तणाव वाढण्‍याची भीती आहे.
- वरिष्‍ठ पोलिस अधिका-यांनी अनुपम यांना सांगितले की, ते काश्‍मिरमध्‍ये कोठेही जाऊ शकतात. मात्र, सध्‍या त्‍यांना एनआयटीमध्‍ये जाण्‍यासाठी परवानगी नाही.
- त्‍यांना इंडिगो एअरलाइंसच्‍या विमानाने दिल्लीला पाठवण्‍याची तयारी करण्‍यात आली.
- याआधी शुक्रवारी मानव संसाधन विकास मंत्रालयाचे पथक, मंत्री स्मृती ईराणी आणि
जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनाही एनआयटीमधील दौरा रद्द करावा लागला.

अनुपम यांची व्‍यक्‍त केली नाराजी..
- एनआयटीमध्‍ये जाण्‍यापासून अडवण्‍यात आल्‍याने अनुपम यांनी नाराजी व्‍यक्‍त केली.
- ते म्‍हणाले, 'मी तिथे प्रॉब्लम क्रिएट करण्‍यासाठी नव्‍हे तर, विद्यार्थ्‍यांना मोरल सपोर्ट देण्‍यासाठी जात होतो.'
- 'पोलिसांचे म्‍हणने होते की, मी तेथे गेल्‍यानंतर कायदा आणि सुव्‍यवस्‍थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. मला वाटते की, विद्यापीठ हे ओपन प्लेस आहे. तेथे लाखो लोक जाऊ येऊ शकतात.'
- नाराजी व्‍यक्‍त करताना ते म्‍हणाले, ' येथे एखादी समस्‍या निर्माण होईल, असे काही करण्‍यासाठी मी येथे आलो नाही.'
पुढील स्‍लाइड्सवर वाचा काय आहे एनआयटी वाद.., पाहा संबंधित फोटो..