आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aparna Shrivastav Allegation On US Embassy In New Delhi

देवयानीनंतर आता अपर्णा श्रीवास्‍तवांवरुन भारत-अमेरिका वाद वाढण्‍याची शक्‍यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली/न्‍यूयॉर्क- देवयानी खोब्रागडे प्रकरण अद्याप शमलेले नसताना आणखी एका महिला कर्मचा-यावरुन भारत आणि अमेरिकेत वाद वाढू शकतो. अपर्णा श्रीवास्‍तव असे त्‍यांचे नाव असून त्‍या नवी दिल्‍ली येथे भारतीय दुतावासात कार्यरत होत्‍या. त्‍यांनी अमेरिकन दुतावासावर मानवाधिकारांचे उल्‍लंघन आणि अयोग्‍य वागणूक दिल्‍याचे आरोप केले होते. त्‍यानंतर त्‍यांना कामावरुन कमी करण्‍यात आले होते. याप्रकरणी भारताने अमेरिकेकडे दाद मागावी आणि हा मुद्दा रेटावा, अशी विनंती श्रीवास्‍तव यांनी केली आहे.

अपर्णा श्रीवास्‍तव यांनी सांगितले, की दुतावासात त्‍यांना भारताविरोधात आणि नकारात्‍मक अहवाल बनविण्‍यास सांगण्‍यात येत होते. त्‍यांनी तसेच करण्‍यास नकार दिल्‍यानंतर त्‍यांना त्रास देणे सुरु झाले. त्‍यांच्‍यावर माहिती बाहेर पुरविल्‍याचाही आरोप करण्‍यात आला. एकदा तर त्‍यांना एका खोलीत बंद करण्‍यात आले आणि त्‍यांचा मोबाईलही जप्‍त करण्‍यात आला. यावरुन त्‍यांनी भारत सरकारकडे कारवाईची विनंती केली आहे.