आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या गावाने पाहिले कलामांचे बालपण, नमाजपूर्वी करायचे गणिताचा अभ्यास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - रामेश्वरम येथील कलाम यांचे घर. - Divya Marathi
फाइल फोटो - रामेश्वरम येथील कलाम यांचे घर.
नवी दिल्ली - माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे सोमवार सायंकाळी अकस्मिक निधन झाले. एका व्याख्यानासाठी कलाम शिलाँग येथे गेले होते. कलाम यांचा शिक्षणाकडे सर्वाधिक झुकाव होता. ते कोणताही धर्म, संप्रदायापेक्षा शिक्षणाला अधिक महत्त्व द्यायचे. त्यामुळेच रोज पहाचे नमाजपूर्वी कलाम हे गणिताचा अभ्यास करायचे.

तामिळनाडूच्या धनुषकोडी गांवात जन्म
15 ऑक्टोबर 1931 ला तामिळनाडूच्या रामेश्वरम येथील धनुषकोडी गांवात कलाम यांचा एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे वडील जैनुलाब्दीन फार शिकलेले नव्हते आणि आर्थिक दृष्ट्याही त्यांची स्थिती फारशी चांगली नव्हती. ते मच्छिमारांना भाड्याने जहाज द्यायचे. असे सांगितले जाते की, त्यांना अभ्यासाची एवढी आवड होती की, रोज सकाळी चार वाजता उठून ते गणिताचा अभ्यास करायचे. अभ्यास पूर्ण झाल्यानंतरच ते वडिलांबरोबर नमाज पठन करायचे.

वडिलांकडून शिकले जीवनाचे तत्व
मी फार छोटा होतो.. फक्त सहा वर्षांचा.. त्यावेळी मी वडिलांना त्यांच्या जीवनाचे तत्व सत्यात उतरवताना पाहिले होते.. त्यांनी प्रवाशांना रामेश्वरम्हून धनुषकोडीला नेण्या आणण्यासाठी एक नाव तयार केली होती. काही वेळानंतर रामेश्वरमच्या किनारपट्टीवर एक मोठे वादळ आले. त्या वादळी वाऱ्यांमध्ये त्या नावेचे मोठे नुकसान झाले होते. पण वडिलांनी शांतपणे ते सर्व नुकसान सहन केले. खरं तर ते या सर्व प्रकारामुळे अधिक परेशान होते.

सुरक्षेची काळजी नाही
एकदा कलाम हे कार्यक्रमात 400 मुलांना मार्गदर्शन करत होते. त्याचवेळी अचानक वीज गुल झाली. तेव्हा कलाम हे मुलांच्या मध्यभागी गेले. त्यांनी सर्व मुलांना त्यांच्या आसपास बसण्यास सांगितले आणि त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

संपत्तीही दान केली
सरकार राष्ट्रपती आणि माजी राष्ट्रपतींचा सर्व खर्च करत असते. हे समजताच कलाम यांनी त्यांची संपूर्ण संपत्ती आणि जीवनभराची बचत त्यांनीच तयार केलेल्या एका ट्रस्टला दान केली. डॉ. वर्गीस कुरियन यांना ते म्हणाले की, मी आता राष्ट्रपती बनलो आहे. त्यामुळे मी आता बचतीचे पैसे आणि पगाराचे काय करणार.

पुढील स्लाइड्सवर पाहा, एपीजे अब्दुल कलाम यांच्या गावाचे आणि शाळेचे PHOTO