आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LIVE : मनमोहनसिंग, साेनिया गांधी, तेंडूलकर यांनी घेतले अंत्‍यदर्शन; उद्या होणार अंत्‍यसंस्‍कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो ओळ- अब्दुल कलाम यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.)
दिल्‍ली- माजी राष्ट्रपती आणि विद्यार्थ्यांचे लाडके शिक्षक डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्‍या अंत्‍यदर्शनाला त्‍यांच्‍या दिल्‍ली येथील शासकीय निवासस्‍थानी लोकांची रीघ लागली आहे. दरम्‍यान, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व एचडी देवगौड़ा, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्‍यासह माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांनी कलामांचे अंत्‍यदर्शन घेतले.
हवाई दलाचे विशेष विमान दिल्‍लीला पार्थिव घेऊन आले. विमानतळावर तीनही सैन्‍य दलाकडून कलामांना मानवंदना दिली गेली. या वेळी प्रोटोकॉल मोडत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीही विमानतळावर हजर राहत श्रद्धांजली अर्पण केली. कलामांचे अखेरचे दर्शना घेण्‍यासाठी त्‍यांच्‍या निवासस्‍थानी नागरिकांनी गर्दी केली आहे.
अब्दुल कलाम यांना आज संसदेत श्रद्धांजली अर्पण करण्‍यात आली. दुपारी 4 नंतर कलामांचे अंत्‍यदर्शन घेता येईल, अशी माहिती कलाम यांचे माध्‍यम सचिव एस. एम. खान यांनी दिली. त्‍यांचे मोठे बंधू महंमद मुथू मीरा लेबाई मराकायार (99) हेही दिल्लीला येणार आहेत.

सकाळी सव्वासहाच्या सुमारास शिलाँगहून हवाईदलाच्या विमानाने गुवाहाटीला कलाम यांचे पार्थिव आणण्यात आले. कलाम यांचे पार्थिव गुवाहाटीच्‍या विमानतळावर आणल्यानंतर मेघालयचे राज्यपाल व्ही.शानमुघनाथन यांनी श्रद्धांजली वाहिली. त्‍यानंतर ते दिल्‍लीकडे रवाना करण्‍यात आले होते.

रामेश्वरममध्‍ये उद्या होणार अंत्‍यसंस्कार
आज (मंगळवार) दुपारी डॉ. कलाम यांचे पार्थिव दिल्लीला पोहोचणार आहे. त्‍या ठिकाणी त्‍यांचे अंत्‍यदर्शन घेता येणार आहे. उद्या ( बुधवार) तमीळनाडूमधील रामेश्‍वरम या त्‍यांच्‍या मूळ गावी त्‍यांच्‍या पार्थिवावर अंत्‍यसंस्‍कार केले जाणार आहेत.
'मला माझ्या भावाला एकदा पाहू द्या'
कलाम यांच्‍या मृत्‍यूचे वृत्‍त धडकताच त्‍यांच्‍या कुटुंबासह अख्‍खे रामेश्वरम शोकसागरात बुडाले. त्‍यांच्‍या घराबाहेर नागरिकांनी गर्दी केली. दरम्‍यान, त्‍या ठिकाणी पोलिस बंदोबस्‍तही तैनात करण्‍यात आला आहे. कलाम यांचे मोठे महंमद मुथू मीरा लेबाई मराकायार (99) यांना शोक अनावर झाला असून, ते ढसाढसा रडत आहेत. आपल्‍या लहान भावाला पाहायचे आहे, हा हट्ट ते धरून बसलेत.
दिल्‍लीत कॅबिनेटची बैठक
कलाम यांच्‍या अंत्‍यसंस्‍काराचे नियोजन करण्‍यासाठी आज (मंगळवार) केंद्रीय कॅबिनेटची विशेष बैठक झाली.
पृथ्वीवर लेक्चर देण्‍यासाठी शिलॉन्गला गेले होते
डॉ. कलाम हे IIM शिलॉन्गमध्‍ये ‘लिव्‍हेबल प्लॅनेट अर्थ सब्जेक्ट’वर लेक्चर देण्‍यासाठी गेले होते. या बाबत त्‍यांनी ट्वीटही केले होते. ते त्‍यांचे शेवटचे ट्वीट ठरले. 15 ऑक्‍टोबर 1931 रोजी तमीळनाडूच्‍या रामेश्वरममध्‍ये त्‍यांचा जन्‍म झाला होता. वर्ष 2002 मध्‍ये त्‍यांनी देशाचे अकरावे राष्ट्रपती म्‍हणून शपथ घेतली होती. मिसाइलमॅन म्‍हणून त्‍यांची खास ओळख होती.
शिलॉंगमध्ये ‘कलाम अमर रहे’ ची घोषणा
शिलॉंगमध्ये अब्दुल कलाम यांचे निधन झाल्याची बातमी पसरल्यावर येथील बेथनी रुग्णालयाबाहेर लोकांनी मोठी गर्दी केली. यावेळी कलाम अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या. लोकांचे डोळे पाणावले होते. चेहऱ्यावर शोककळा पसरली होती.
सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा
अब्दुल कलाम यांच्या निधनाने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 27 जुलैपासून 02 ऑगस्टपर्यंत राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. यावेळी देशातील सर्व शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रीय ध्वज अर्धा खाली घेण्यात येणार आहे. या दरम्यान कोणताही मनोरंजनात्मक कार्य़क्रम आयोजित केला जाणार नाही.
* डॉ. कलाम यांचं पार्थिव दिल्ली विमानतळावर पोहोचलं, पंतप्रधान मोदी, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हजर

* राष्ट्रीय संशोधन मोहिमेला डॉ. अब्दुल कलाम यांचं नाव देणार, केंद्रीय मंत्री स्मृती इराणींची घोषणा

* दिल्लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल म्‍हणाले, देशातील सामान्‍य नागरिकांचे राष्‍ट्रपती होते कलाम. त्‍यांच्‍या निधनाने मोठे नुकसान

* दिल्लीच्‍या 10 राजाजी मार्गावर ठेवले जाणार डॉ. कलाम यांचे पार्थिव शरीर, घराच्‍या बाहेर वाढवली सुरक्षा. आर्मीचे जवान पोहोचले.
* संसदमध्‍ये वाहनार कलाम यांना श्रद्धांजली:
* गुवाहाटीमध्‍ये मुख्‍यमंत्री तरुण गोगोई वाहिली श्रद्धांजली.
पुढील स्‍लाइडवर पाहा संबंधित फोटो....