आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरोघरी पेपर टाकण्यापासून अनेक कामे केली, कलामांना व्हायचे होते पायलट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचे सोमवारी निधन झाले. सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले कलाम देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचले. 15 ऑक्टोबर 1931 मध्ये तामिळनाडूच्या रामेश्वरमध्ये त्यांचा जन्म झाला होता. गरीब कुटुंबात जन्मलेले कलाम यांचे वडील नाव चालवण्याचे काम करत असायचे. मोठे कुटुंब असल्यामुळे लहानग्या अब्दुलला देखील काहीतरी उद्योग करावा असे वाटत होते. त्यासाठी त्यांनी वृत्तपत्र वाटण्याचे काम सुरु केले. मात्र त्यासाठी त्यांनी शिक्षण सोडले तर नाही पण त्याकडे दुर्लभ देखील केले नाही. रात्री कंदिलाच्या उजेडात अभ्यास करुन सकाळी ते घरोघर वृत्तपत्र वाटण्याचे काम करत असायचे.

रामेश्वरममध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर कलामांनी सेंट जोसफ कॉलेजमधून पदवी घेतली. 1954 मध्ये मद्राय विद्यापीठातून त्यांनी फिजिक्स विषयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानतंर एरोस्पेस इंजिनिअरिंगसाठी ते मद्रासला गेले. कलामांना फायटर प्लेन पायलट बनण्याची इच्छा होती. आयएफसीच्या परीक्षेत ते नवव्या स्थानी होती, मात्र त्या पदासाठी फक्त आठ जागा असल्याने त्यांची संधी हुकली.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कलामांशी संबंधीत फोटो