आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Apologise To Sushmaji Or Face Defamation Case Say Ninti Gadkari

राहुल गांधी माफी मागा, अन्यथा मानहानीचा खटला दाखल करु -गडकरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्यावरुन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांना ठणकावले आहे. सुषमा स्वराज यांना राहुल गांधी यांनी क्रिमीनल म्हटले असल्याचे सांगत गडकरी म्हणाले, त्यांनी माफी मागितली नाही तर त्यांच्यावर अब्रुनूकसानीचा दावा दाखल करु. गुरुवारी राहुल गांधी यांनी सुषमा स्वराज यांनी एका पळपुट्याला मदत करुन गुन्हेगारी कृत्य केले. त्यांना तुरुंगात टाकले पाहिजे, असे म्हटले होते.

गडकरी म्हणाले - सुषमाजींनी काहीही चूक केले नाही
गडकरींनी शुक्रवारी संसद भवन परिसरात सुषमा स्वराज यांची बाजू घेतली. ते म्हणाले, सुषमाजींनी काहीही चूकीचे केलेले नाही. त्यांनी काही भ्रष्टाचार केला नाही. राहुल गांधी यांनी त्यांची माफी मागावी नाही तर आम्ही त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करु. सुषमा स्वराज या केवळ देशाच्या मोठ्या नेत्या नाहीत तर, त्या परराष्ट्र मंत्री आहेत. त्या जगात भारताचे प्रतिनिधीत्व करतात. राहुल यांनी हे लक्षात घेतले पाहिजे.
काय म्हणाले होते राहुल गांधी
राहुल गांधी यांनी गुरुवारी म्हटले होते - कारवाई तर लांबची गोष्ट आहे. मोदींनी फक्त एवढे सांगावे की भ्रष्टाचाराबद्दल त्यांचे काय मत आहे ? आम्ही तर सांगितले आहे, नो डिस्कशन विदाऊट रेजिगनेशन ! सुषमाजींनी क्रिमीनल अॅक्ट केला आहे. त्यांना तर जेलमध्ये जावेच लागेल. त्यांनी एका पळपुटयाला मदत केली आहे.
पुढील स्लाइडमध्ये, संसद परिसरात भाजपचे धरणे