आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • App Issue In Dilhi, Tatun Yadav Blame On MLA Girish Soni

AAPच्या कार्यक्रमात गोंधळ, आमदार गिरीश सोनींवर घर हडपल्याचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: 'आप'चे आमदार गिरीश सोनी)

नवी दिल्ली- दिल्लीत विधानसभा निवडणुका जाहीर होण्याआधीच राजकीय नेत्यांवर आरोप- प्रत्यारोप सुरु झाले आहेत. आम आदमी पक्षाच्या (आप) शनिवार झालेल्या कार्यक्रमात एका व्यक्तींने गोंधळ घातला. तरुण यादव असे या व्यक्तीचे नाव असून त्याने 'आप'चे आमदार गिरीश सोनी यांच्यावर घर हडपल्याचा घणाघाती आरोप केला आहे. आपच्या कार्यालयासाठी दिलेले घर अद्याप रिकामे करून दिले नसल्याचे यादव यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे, 'आप' राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. केजरीवाल म्हणाले, या प्रकरणाची आपल्याला माहिती नाही. या प्रकरणी संपूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतरच स्पष्टीकरण देणे योग्य ठरेल. मात्र, आता असे अनेक लोक आरोप करतील, भाजपचे हे कारस्थान असल्याचाही आरोप केजरीवाल यांनी केला आहे.

तरूण यादव यांनी सांगितले की, दिल्लीत यापूर्वी झालेल्या निवडणुकीच्या काळात 'आप' च्या कार्यालयासाठी आपले घर दिले होते. परंतु निवडणुका होऊन आठ महिने झाले तरी 'आप' ने यादव यांचे घर रिकामे करून दिलेले नाही.
तरूण यादव यांनी सांगितले की, दिल्लीत यापूर्वी झालेल्या निवडणुकीच्या काळात 'आप' च्या कार्यालयासाठी आपले घर दिले होते. परंतु निवडणुका होऊन आठ महिने झाले तरी 'आप' ने यादव यांचे घर रिकामे करून दिलेले नाही.
यादव यांनी सांगितले की, आपने कोणताही भाडे करारनामा केलेला नाही. तसेच भाड्याचे रुपयेही देत नाही. तरुण यादव याने आमदार सोनी यांच्यावर आरोप केल्यानंतर 'आप'च्या कार्यकर्त्यांनी त्याला बेदम मारहाण केल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, आमदार गिरीश सोनी हे अरविंद केजरीवाल यांचे 49 दिवस चाललेल्या सरकारमध्ये मंत्री होते. दिल्लीमधील मादीपूर विधानसभा संघातून निवडणूक आले होते.