आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज पत्नीचे चरणस्पर्श करणाऱ्या दिल्लीच्या महिला कल्याण मंत्र्याची अश्लील सीडी उघडकीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
CD मधील एक छायाचित्र... - Divya Marathi
CD मधील एक छायाचित्र...
दिल्ली- दिल्लीच्या केजरीवाल सरकारवर आजवरचा सर्वात मोठा डाग लागला आहे. बुधवारी संध्याकाळी दिल्लीचे महिला बालविकास मंत्री संदीपकुमार यांची दोन महिलांसोबतची आक्षेपार्ह सीडी समोर आली. प्रकरण तापताच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संदीपकुमार यांची हकालपट्टी केली.

विशेष म्हणजे हेच संदीपकुमार गतवर्षी महिलादिनी एका कार्यक्रमात म्हणाले होते, ‘मी महिलांचा इतका सन्मान करतो की रोज पत्नीला चरणस्पर्श करूनच घराबाहेर पडतो.’ सीडी प्रकरणात रात्री उशिरापर्यंत संदीपकुमार यांच्याकडून कोणतेही स्पष्टीकरण जारी झाले नाही. त्यांच्या कार्यालयाने सांगितले की, संदीपकुमार आजारी आईला भेटण्यासाठी गावाकडे गेले आहेत.

९ मिनिटांची सीडी, मंत्र्याने स्वत: तयार केल्याचा दावा
मिनिटांच्यासीडीत संदीप महिलेसोबत आक्षेपार्ह स्थितीत. त्यात ११ छायाचित्रे. शेवटी संदीप कॅमेरा वळवत असल्यामुळे व्हिडिओ त्यंानीच बनवल्याचे वाटते.
सीडीसोबतचिठ्ठी : ‘महोदय, मलाकाही छायाचित्रे व्हिडिओ मिळाला. हे दिल्लीचे मंत्री संदीपकुमार यांचे आहेत. यावर योग्य ती कारवाई केली जावी.’अशी चिठ्ठी आहे.

चार वर्षांपासून केजरींसोबत
संदीप२०१२ मध्ये केजरीवाल यांच्याशी जोडले गेले. ते २०१३ ची निवडणूक हरले. २०१५ मध्ये सुलतानपूर माजरातून जिंकले. त्यांनी डीयूमधून पदवी आणि मेरठमधून कायद्याची पदवी संपादन केली आहे.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या आणि अखेरच्या 5 स्लाईडवर बघा, संदीपकुमार यांचे महिलांसोबतचे आक्षेपार्ह फोटो.... या नोटसह मिळाली CD आणि जाणून घ्या, काय आहे नेमका घटनाक्रम... काय म्हणाले केजरीवाल अन् योगेंद्र यादव... केजरीवाल यांच्या बंगल्याबाहेर भाजप कार्यकर्त्यांचे आंदोलन....
बातम्या आणखी आहेत...