आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Application Summon By Union Government For Lokpal Chairman, Members Recruitment

लोकपाल अध्यक्ष, सदस्य भरतीसाठी केंद्र सरकारने मागवले अर्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - संसदेत विधेयक पारित होऊन राष्ट्रपतींचे शिक्कामोर्तब झाल्यानंतर केंद्र सरकारने लोकपालच्या स्थापनेची प्रक्रिया सुरू केली आहे. लोकपाल अध्यक्ष आणि आठ सदस्यांच्या नियुक्तीसाठी अर्ज मागवले आहेत.
कार्मिक मंत्रालयाच्या एक वरिष्ठ अधिका-यानुसार आठपैकी चार पद राखीव आहेत. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांच्या रजिस्ट्रारला योग्य अधिका-यांची नावे पाठवण्याचे सांगण्यात आले आहे. राज्य सरकारच्या मुख्य सचिवांनाही पत्र पाठवण्यात आले आहे. 7 फेब्रुवारीपर्यंत कार्मिक व प्रशिक्षण विभागाच्या सचिवांकडे अर्ज पाठवण्यास सांगण्यात आले आहे. भ्रष्टाचाराचे उच्चाटन करण्यासाठी लोकपाल आणि लोकायुक्त विधेयकास 17 डिसेंबर रोजी राज्यसभेत, तर 18 डिसेंबर रोजी लोकसभेत पारित करण्यात आले होते. राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी 1 जानेवारी रोजी त्यास मंजुरी दिली होती.
पात्रतेच्या अटी व शर्ती
कायद्यानुसार सरन्यायाधीशपद व्यक्ती लोकपाल अध्यक्षपदी असावा किंवा सर्वोच्च न्यायालयाचा विद्यमान अथवा निवृत्त न्यायमूर्तिपद भूषवलेला असावा. शिवाय कोणताही स्वच्छ प्रतिमेचा, प्रामाणिक मान्यवर नागरिकही लोकपाल अध्यक्षपदासाठी पात्र ठरू शकतो.सदस्यपदासाठी न्यायालयीन पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांसाठी सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायमूर्ती अथवा हायकोर्टाचे विद्यमान अथवा निवृत्त मुख्य न्यायमूर्ती असणे गरजेचे आहे.