आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत पुन्हा नियुक्तीची \'जंग\', एलजींनी रद्द केली महिला आयोग अध्यक्षांची नियुक्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वाती मालीवाल यांनी सोमवारीच पदभार स्वीकारला. - Divya Marathi
स्वाती मालीवाल यांनी सोमवारीच पदभार स्वीकारला.
नवी दिल्ली - उपराज्यपाल नजीब जंग यांनी दिल्लीच्या महिला आयोगाच्या नव्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांची नियुक्ती रद्द केली आहे. त्यांनी सोमवारीच पदभार स्वीकारला होता. स्वाती या अरविंद केजरीवाल यांचे नीकटवर्तीय असल्याचे मानले जाते. आपच्या सरकारनेच त्यांची या पदावर नियुक्ती केली होती. दिल्ली सरकारने या प्रकरणी आपले मत जाणून घेतले नसल्याचे उपराज्यपालांच्या कार्यालयाकडून कळवण्यात आले आहे. तर दिल्ली सरकारचे असे म्हणणे आहे की, ही नियुक्ती उपराज्यपालांच्या अधिकारांतर्गत येत नाही.

आधीही झाला होता वाद
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचे कामकाज सांभाळण्यापूर्वीच स्वाती यांच्या नियुक्तीवरून वाद झाला होता. स्वाती या केजरीवाल यांच्या नातेवाईक असल्याचे आरोप करण्यात आले होते. मात्र केजरीवालांनी हे सर्व आरोप फेटाळले होते. स्वाती या आप नेते नवीन जयहिंद यांच्या पत्नी आहेत. हे दाम्पत्य अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय असल्याचे मानले जाते. स्वाती केजरीवाल यांच्याबरोबर 2007 पासून संलग्न आहेत. इंडिया अगेनस्ट करप्शनच्या आंदोलनात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. महिला आयोगाच्या अध्यक्ष बनण्यापूर्वी स्वाती या दिल्ली सरकारमध्ये सल्लागार पदावर होत्या.
बातम्या आणखी आहेत...