आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • April Democratic Month Election 2014 Latest News In Marathi

एप्रिल डेमोक्रॅटिक महिना; जगातील 6 देशांत मतदान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सोमवारी भारताच्या काही भागांत पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले आणि यासोबतच देशातल्या लोकसभा निवडणुकीलाही प्रारंभ झाला. पण या महिन्यात फक्त भारतातच नव्हे, तर जगभरातील सहा देशांमध्ये निवडणुकांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सुमारे 106 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
या वर्षीचा एप्रिल महिना हा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण असल्यामुळे याला जगातील सर्वाधिक डेमोक्रॅटिक महिना म्हटले जात आहे. एप्रिलमध्ये भारतासोबतच अफगाणिस्तान, हंगेरी, इंडोनेशिया, अल्जेरिया आणि इराकमध्ये निवडणुका असून यापैकी अफगाणिस्तानमध्ये शनिवारी आणि हंगेरीत रविवारी निवडणुका पार पडल्या. भारतातही सोमवारपासून निवडणुकांचे सत्र सुरू झाले आहे.पहिल्या टप्प्यात आसामच्या 5 आणि त्रिपुराच्या एका जागेसाठी निवडणूक पार पडली.
वर्षभरात 48 देशांत निवडणुका : चालू वर्षात जगभरातील 48 देशांमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या वर्षी पृथ्वीवरील दर पाच व्यक्तींपैकी एक जण आपले सरकार निवडण्यासाठी मतदान करणार आहे. जगातील या 48 देशांमध्ये भारत सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र आहे. इतकेच नव्हे तर भारतात मतदारांची एकूण संख्या ही युरोपच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे.
फिलिपाइन्सच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त तर भारतातील नवे मतदार आहेत.
हंगेरी : रविवारी मतदान संपन्न. एकूण मतदार - 2.1 कोटी. एकूण 51 कोटी मतदान झाले.
अल्जेरिया : 17 एप्रिल रोजी मतदान. एकूण मतदार - 2.1 कोटी
इंडोनेशिया : 9 एप्रिल ते जुलैपर्यंत. एकूण मतदार- 18.65 कोटी
इराक : 30 एप्रिल रोजी मतदान. एकूण मतदार- 1.8 कोटी
अफगाणिस्तान : शनिवारी मतदान संपन्न. एकूण मतदार- 1.2 कोटी. एकूण 58 टक्के मतदान झाले.
भारत : 7 एप्रिल ते 12 मेदरम्यान लोकसभा निवडणुका. एकूण मतदार- 81.5 कोटी

पुढील स्लाइडमध्ये पाहा, भारतातील निवडणूकीचे रंग