आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलपीयूचे विद्यार्थी व्यवस्थापनाच्या प्रशिक्षणासाठी अमेरिकेला रवाना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालंधर- लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीतील 16 विद्यार्थी सहा आठवड्यांसाठी संशोधनात्मक व समग्र प्रशिक्षणासाठी अमेरिकेला रवाना झाले आहेत. ओहियोतील हिराम कॉलेजमध्ये ते प्रशिक्षण घेणार आहेत.

दौर्‍यात बी.टेक.चे विद्यार्थी ऑपरेशन मॅनेजमेंट विषयात प्रशिक्षण प्राप्त करतील. एमबीएचे विद्यार्थी वित्त संस्था आणि बहुराष्टÑीय कंपन्यांमध्ये व्यवस्थापनाचे धडे घेतील. ते जनरल मोटर्स, आर्सेलर मित्तल स्टील, नासाला भेट देऊन उद्योग क्षेत्रातील मान्यवरांसोबत चर्चात्मक कार्यक्रमात भाग घेतील. विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना एलपीयूचे कुलगुरू अशोक मित्तल म्हणाले, आंत्रप्रिन्युअरशिप, लीडरशिप, दूरसंचार, टेक्नॉलॉजीच्या प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांना फायदा होईल. एलपीयू आपल्या एमबीए, बीटेक, बीबीए विद्यार्थ्यांची जागतिक भेट आयोजित करते. युनिव्हर्सिटीच्या ग्लोबल आंत्रप्रिन्युअरशिप कार्यक्रमांतर्गत युरोप, लॅटिन अमेरिका, आफ्रिका, आशियामध्ये ट्रेनिंग/इंटर्नशिप होते.